AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातून देवेंद्र फडणवीस यांना धक्का, भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर

शिशुपाल पटले राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत असताना पक्ष सोडत आहे. आता ते काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना त्यासाठी तयार केले आहेत. त्यांना तुमसर विधानसभा मतदार संघातून दिली जाणार आहे.

विदर्भातून देवेंद्र फडणवीस यांना धक्का, भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर
शिशुपाल पटले, देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 16, 2024 | 10:58 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस नागपूरात तळ ठोकून आहेत. ते विविध भागात जाऊन सामान्य नागरिकांच्या घरी जाऊन घेत आहे. गुरुवारी त्यांनी 30 परिवाराच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्याचवेळी विदर्भातील बडा नेता भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. हा नेता भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. भंडारा-गोंदियाचे भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश मुंबईत होत आहे. वरिष्ठ नेत्यांकडून झालेले दुर्लक्ष आणि पक्षाकडून सुरू असलेल्या अवहेलनामुळे ते भाजपमधून बाहेर पडलेले आहेत. शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी मोठा झटका आहे.

पोवार समाजातील महत्वाचे नेते

काही दिवसांपूर्वी शिशुपाल पटले यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली नव्हती. त्यांनी राजीनामा दिल्यावर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आता शिशूपाल पटले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होत असताना पोवार समाजातील महत्वाचे नेते असलेले पटले पक्ष सोडत असल्यामुळे भाजपला धक्का मानला जात आहे. 2004 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले होते.

शिशुपाल पटले यांची राजकीय ताकद

शिशुपाल पटले हे पोवार समाजाचे नेते आहेत. त्यांची राजकीय ताकद मोठी आहे. भंडार गोंदीया मतदार संघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजप सोबत एकनिष्ठ राहिले होते. परंतु वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना डावलले गेले. त्यांना पक्षीय कार्यक्रमात न बोलावणे, कार्यक्रमांच्या पत्रिकेत त्यांचे नाव न टाकणे, व्यासपीठावर स्थान न देणे, भाषण करण्याची संधी न देणे, असे प्रकार पटले यांच्यासोबत झाले. त्यामुळे ते भाजपमध्ये नाराज झाले. पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे, असा आरोप करत त्यांनी 25 जुलै रोजी भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता.

शिशुपाल पटले राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत असताना पक्ष सोडत आहे. आता ते काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना त्यासाठी तयार केले आहेत. त्यांना तुमसर विधानसभा मतदार संघातून दिली जाणार आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.