तर तुम्ही खरे मर्द- सामनातून भाजपवर पुन्हा वार

तर तुम्ही खरे मर्द- सामनातून भाजपवर पुन्हा वार

जवानांच्या हौतात्म्यचा अपमान करणाऱ्या गोस्वामीविरोधातही भाजप असे दाखल करणार असेल तर ते खरे मर्द, अशा खरमरीत शब्दांत शिवसेनेने भाजपला डिवचले आहे. (Shiv Sena Tandav Goswami chat)

prajwal dhage

|

Jan 21, 2021 | 9:02 AM

मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी (Arnav Goswami) आणि बार्कचे माजी कार्यकारी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) यांच्यातील व्हॉट्सअ‌ॅप चॅट उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर तांडव वेबमालिकेवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून भाजपवर खोचक टीका केली आहे. “तांडवचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले. पण जवानांच्या हौतात्म्यचा अपमान करणाऱ्या गोस्वामींविरोधातही भाजप असे गुन्हे दाखल करणार असेल तर ते खरे मर्द,” अशा खरमरीत शब्दांत शिवसेनेने भाजपला डिवचले आहे. तसेच, अर्णब गोस्वामी यांच्या देशद्रोहावरही चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल, असे शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे. (Shiv Sena criticises bjp on Tandav and Arnab Goswami leak chat)

हा तर देश, देव आणि धर्माचा अपमान

चीन आणि भारत देशामध्ये मागील काही काळापासून सीमाप्रश्नावरुन वाद सुरु आहेत. भारतातील काही भाग चीनने बळकावल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. तसेच बालाकोट येथे हल्ल्याबाबतची माहिती अर्णव गोस्वामी यांना होती, असा आरोपही त्यांची चॅट उघड झाल्यानंतर होतो आहे. यावर शिवसेनेने सामनामध्ये भाष्य केले आहे. “चीनने लडाखमध्ये घुसून हिंदुस्थानच्या जमिनीचा ताबा घेतला, चीन मागे हटायला तयार नाही यावर ‘तांडव’ का होत नाही? गोस्वामी यांनी 40 जवानांच्या हत्येवर आनंद व्यक्त करणे हा देश, देव आणि धर्माचाच अपमान आहे,” अशी टीका शिवसेनेने केली. तसेच, यावर भाजप का बोलत नाही, असा सवालही शिवसेनेने भाजपला केला.

भाजपच्या तांडवमध्ये प्रामाणिकपणाचा लवलेश नाही

तांडव या वेबमालिकेला भाजपकडून विरोध होतोय. या वेबमालिकेत हिंदू देवतांविरोधात भाष्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना तांडवविरोधात भाजपने घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेने टीका केली आहे. “एम.एफ. हुसेन हे नक्कीच महान चित्रकार होते. पण त्यांनी हिंदू देवतांची चित्रे ज्या पद्धतीने रेखाटली त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला. वाद इतका पेटला की, एम.एफ. हुसेन यांना देश सोडून जावे लागले. त्यामुळे हिंदू देवदेवतांच्या अवमानप्रश्नी कोणतीही तडजोड शक्यच नाही, पण भारतीय जनता पक्षाने जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहे,” असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटलंय.

संबंधित बातम्या  :

TANDAV Web Series : अखेर तांडव वेब सीरिजविरोधात FIR, निर्माते, कलाकारांचीही नावं

(Shiv Sena criticises bjp on Tandav and Arnab Goswami leak chat)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें