AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती उघड

आदित्य ठाकरे यांची चल संपत्ती 15 कोटींहून जास्त आहे. तर अचल संपत्ती (स्थावर मालमत्ता) 6 कोटी 4 लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरे यांची बँकेतील रक्कम आणि ठेवी ही 2 कोटी 81 लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरे यांनी 5 लाखांचे 50 हजार शेअर घेतले आहेत.

आदित्य ठाकरे यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती उघड
आदित्य ठाकरे
| Edited By: | Updated on: Oct 24, 2024 | 8:15 PM
Share

आदित्य ठाकरेंकडून वरळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगात उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारांना प्रतित्रापत्रात आपल्या नावावर किती संपत्ती आहे, याची माहिती देणं बंधनकारक असतं. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनीदेखील प्रतित्रापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. आदित्य ठाकरेंकडे 15 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची चल संपत्ती आहे. चल संपत्ती म्हणजे जी संपत्ती आपण कुठेही सोबत घेऊन जाऊ शकतो. उदाहरणार्थ रोख रक्कम किंवा दागिणे वगैरे. आदित्य ठाकरेंकडे अशी 15 कोटींहून जास्त चल संपत्ती असल्याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

आदित्य ठाकरे यांची चल संपत्ती 15 कोटींहून जास्त आहे. तर अचल संपत्ती (स्थावर मालमत्ता) 6 कोटी 4 लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरे यांची बँकेतील रक्कम आणि ठेवी ही 2 कोटी 81 लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरे यांनी 5 लाखांचे 50 हजार शेअर घेतले आहेत. तसेच त्यांनी म्युचुअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये एकूण 10 कोटी 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख रुपयांचे सोन्या-चांदी आहे. आदित्य ठाकरे यांची कर्जतच्या भिसेगांव येथे 171 स्केवअर मीटर इतकी जमीन आहे.

आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीविषयी थोडक्यात माहिती

  • प्रतिज्ञापत्रानुसार, आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. डिलाईल रोड खुला केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.
  • आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा आहे, ज्याचं आताचं बाजारमूल्य १ कोटी ४८ लाख ५१ हजार ३५० रुपये आहे.
  • याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. त्यांचं आताचं बाजार मूल्य ४ कोटी ५६ लाख रुपये आहे.
  • आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW चार चाकी वाहन आहे.
  • आदित्य ठाकरे यांच्याकडे १ कोटी ९१ लाख ०७ हजार १५९ रुपयांचे दागिने आहेत
  • आदित्य ठाकरेंकडे १५ कोटी ४३ लाख ०३ हजार ०६० जंगम मालमत्ता आहे. तर ६ कोटी ०४ लाख ५१ हजार ३५० रुपयांची अचल मालमत्ता आहे.
  • आदित्य ठाकरे यांच्या बँक खात्यात २ कोटी ४४ लाख १८ हजार ९८५ रुपये आहेत.
  • बँक खात्यात फिक्स डिपॉसिट – २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ रुपये
  • शेअर मार्केट गुंतवणूक – ७० हजार
  • म्युच्युअल फंड – १० कोटी १३ लाख ७८ हजार ०५२ रुपये
  • बॉण्ड्स – ५० हजार रुपये
  • एकूण गुंतवणूक (स्वतः) – १० कोटी १४ लाख ९८ हजार ०५२ रुपये
  • LIC पॉलिसी – २१ लाख ५५ हजार ७४१ रुपये
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.