AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हायरल व्हिडीओनंतर शिवसेनेच्या महिला नेत्याचा संताप, म्हणाल्या, मी काही दोन नंबरच्या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला नाही…

Solapur News : सध्या सोशल मीडियावर शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वाघमारे यांनी फोन केला असता जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना झापले. यावर आता ज्योती वाघमारे यांनी भाष्य केले.

व्हायरल व्हिडीओनंतर शिवसेनेच्या महिला नेत्याचा संताप, म्हणाल्या, मी काही दोन नंबरच्या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला नाही...
Jyoti Waghmare
| Updated on: Sep 29, 2025 | 1:51 PM
Share

राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक भागात पूर आला. अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यावरील संकट अजूनही टळले नाहीये. कमी दाबाचा पट्टा अजूनही आहे. आज देखील अनेक भागात भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय. लोकांची शेती, घरे पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. सरकारने मदत देखील जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत खालची यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे की, नाही यावर लक्ष ठेऊन बाहेर जाऊन काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाकडून लोकांना मदत पोहोचवण्याचे काम देखील सुरू आहे.

यादरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या लोकांच्या मदतीला पोहोचल्या. लोकांना वाटण्यासाठी 200 किट घेऊन त्या सोलापूरमध्ये पोहोचल्या. यादरम्यान लोकांनी आम्हाला जेवणाच्या पूर्ण किट भेटल्या नसल्याचे सांगितल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी हा फोन जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेला. फोन स्पीकरवर ठेऊन त्या लोकांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना बोलत होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांनाच झापले. सध्या काय महत्वाचे आहे हे सांगून तुम्ही देखील लोकांना मदत करा. 3 हजार लोक असताना तुम्ही 200 किट घेऊन पोहोचल्या असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसलाय. आता यावर ज्योती वाघमारे यांनी थेट भाष्य केले. त्यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे.

ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मी जिल्हाधिकाऱ्यांना दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी, टेंडरसाठी किंवा बेकायदेशीर कामासाठी कॉल केलेला नव्हता. जर पूरग्रस्त गावात प्रशासनाचे जेवण पोहोचत नसल्याचे प्रशासनाला सांगितले तर तो माझा गुन्हा आहे का? गोरगरिबांचा आवाज बनणं गुन्हा असेल तर तो मी हजार वेळा करेल. गावात मदत पोहोचत नसल्याने मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता.

त्यात मी त्यांना एकेरी भाषा वापरलेली आहे का? कोण्या नेत्याच्या नावाने धमक्या दिल्यात का? त्यांना शिवीगाळ केलीय का? मदत पोहोचली नाही हे सांगितल्यानंतर तुम्ही किती मदत दिली असं विचारून राजकारण कोण करतय हे जनतेने सांगावं. ज्यांच्या पायाला चिखल देखील लागला नाही ते लोक मला ट्रोल करत आहेत. मात्र, मी त्यांना भीक घालत नाही, असे स्पष्टपणे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या