AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. या नेत्याच्या विधानामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचं विधान या नेत्यानं केलं आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ
एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 4:44 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांंचं शेतकरी कर्जमाफीमधील अट सरकारने रद्द करावी, या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक नेत्यांनी पंढरपूरमध्ये येऊन रोहित पवार यांची भेट घेतली आहे, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पंढरपूरमध्ये रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी भेट दिली आहे, त्यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हटले?  

पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदे साहेबांचा घात होऊ शकतो,  असं खळबळजनक वक्तव्य मगर यांनी केलं आहे.  मी सरकारमधला आहे, पण अजितदादांसोबत काय झाले ते सगळ्यांना माहिती आहे.  मी शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आणि माळशिरस तालुका पंचायत समिती सभापती आहे. शेतकऱ्याचा एक कैवारी अजित पवार आपल्यामधून कसे हिरावले गेले, हे सर्वांना माहीत आहे.  आता आपल्याला या दुसऱ्या कैवाऱ्याला (रोहित पवार) जपायचे आहे, असं मगर यांनी म्हटलं आहे.

मला खंत वाटते ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची, त्यांचाही असाच घातपात होऊ शकतो. एकनाथ शिंदे साहेबांचा घात होण्याची शक्यता वाटते,  अजितदादा कसे गेले हे सर्वांना माहिती आहे. असंही यावेळी मगर यांनी म्हटलं आहे.

काय आहे रोहित पवारांची मागणी? 

सरकारने दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी केली आहे. परंतु दोन लाखांच्या वर ज्यांचं कर्ज आहे, त्यांना आधी उर्वरीत रक्कम एक रकमी भरावी लागणार आहे, तरच त्यांना दोन लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, सरकारने ही अट रद्द करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती