नवनीत राणा-रवी राणांविरोधात शिवसेना आक्रमक, अमरावतीत फोटोंना चपलांचा हार घालत घोषणाबाजी

दीपाली चव्हाण प्रकरणातील दोषींच्या प्रतिमेचे होळीत दहन करताना राणा दाम्पत्याने चपलांचा वापर केला. त्यामुळे हिंदू धर्मीयांची भावना दुखावला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. (Shivsena condemns Navneet Rana Ravi Rana)

नवनीत राणा-रवी राणांविरोधात शिवसेना आक्रमक, अमरावतीत फोटोंना चपलांचा हार घालत घोषणाबाजी
राणा दाम्पत्याच्या प्रतिमांचा शिवसेनेकडून चपलांचा हार घालून निषेध
अनिश बेंद्रे

|

Mar 30, 2021 | 1:18 PM

अमरावती : मेळघाटातील RFO दीपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide) आत्महत्या प्रकरणातील दोषींचा निषेध व्यक्त करताना राणा दाम्पत्याने होळी सणाचा अवमान केला, असा आरोप शिवसेनेने केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या फोटोला शिवसेना कार्यकर्त्यांनी चपलांचा हार घातला. (Shivsena condemns  Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana images with shoes for burning effigies Deepali Chavan Suicide accuse in Holi)

नेमकं काय घडलं?

मेळघाटमधील RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात हरिसालमधील आरोपी विनोद शिवकुमार आणि मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निषेधार्थ होळी करण्यात आली होती. मात्र या होळीत राणा दाम्पत्याने चपलांचा वापर केला होता. त्यामुळे हिंदू धर्मीयांची भावना दुखावला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

राणा दाम्पत्याच्या फोटोंना हार

होळीसारख्या हिंदू धर्मीयांच्या पवित्र सणाचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हरीसाल येथे अपमान केल्याचा आरोप शिवसेनेने केला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक आंदोलन केले. त्यानंतर दोघांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

दीपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide) यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींच्या प्रतिमेचे राणा दाम्पत्याने रविवारी संध्याकाळी दहन केले. खासदार, आमदार, गावकरी आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणारे डीएफओ शिवकुमार आणि सीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्या पुतळ्याचे होळीमध्ये दहन करुन राणा दाम्पत्याने घटनेचा निषेध व्यक्त केला.

हरीसाल येथील शासकीय निवासस्थानाला भेट

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या हरीसाल येथील शासकीय निवासस्थानाला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करत ही दुर्दैवी घटना कशी घडली याची माहिती शेकडो आदिवासी बांधव आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.

कर्तव्यदक्ष महिलेच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी

एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागणे, अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे नवनीत रवी राणा म्हणाल्या. यासाठी जबाबदार असणाऱ्या शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कलम 302 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आपण राज्यपाल, केंद्रीय वनमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे वचनही त्यांनी गावकऱ्यांना दिले.

संबंधित बातम्या :

दीपाली चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त, आरोपींच्या प्रतिमांचं नवनीत राणांच्या हस्ते होलिकादहन

VIDEO | मेळघाटात खासदार नवनीत राणा यांचा कोरकू नृत्यावर ठेका

(Shivsena condemns  Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana images with shoes for burning effigies Deepali Chavan Suicide accuse in Holi)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें