AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, कर्नाटकात शिवसेनेची एंट्री, बेळगावात भगवा झेंडा फडकला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बेळगाव येथील १२ मठाधिपतींनी शिवसेनेत प्रवेश केला. पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला असून, यामुळे कर्नाटकात शिवसेनेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, कर्नाटकात शिवसेनेची एंट्री, बेळगावात भगवा झेंडा फडकला
shivsena 1
| Updated on: Aug 04, 2025 | 2:26 PM
Share

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे पक्ष बदल करताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बेळगावातील १२ मठाधिपतींनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. दत्त गगनगिरी ध्यानमंदिराचे मठाधिपती प.पु. पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली चिकोडी येथील अनेक महाराजांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे कर्नाटकातील बेळगावमध्ये शिवसेना पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी एक पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पुरुषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी, नूतन धनावडे, बाळकृष्ण कांबळे, सुवेल शेट्टे, मयूर गुरव, साई पाटील, अनिकेत वरके, सुषमा खरात, दीपा फडणवीस, अरविंद शिरळाकर, दादा महाराज आणि अजय घराडे या महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला.

साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी

मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असे ते म्हणाले. महाराष्ट्र हा साधुसंताचा आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन साधुंची हत्या देशाने पाहिली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, हिंदुत्वाचा पुढे घेऊन जाण्याचे काम आधात्मातून सर्व साधु संन्यासीजन करत आहेत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे वरचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया

महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार होता, मात्र आता काहीजणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. साधुसंतांचे आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया, शिवसेना संतांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.