AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांना एका वर्षानंतर शुद्ध आल्याचा आनंद; गुलाबराव पाटलांचा पलटवार

अमित शाहांना एका वर्षानंतर शुद्ध आल्याचा आनंद असल्याचा पलटवार गुलाबराव पाटील यांनी केला. (Gulabrao Patil Amit Shah)

अमित शाहांना एका वर्षानंतर शुद्ध आल्याचा आनंद; गुलाबराव पाटलांचा पलटवार
गुलाबराव पाटील अमित शाह
| Updated on: Feb 09, 2021 | 2:59 PM
Share

जळगाव: सार्वजिनक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आला, याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. ( Shivsena leader Gulabrao Patil Slams Home minister Amit Shah at Jalgaon)

काय म्हणाले होते अमित शाह?

भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमासाठी आलेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही. जनदेशाचा अनादर करत सत्तेसाठी शिवसेना विरोधी पक्षांसोबत गेल्याची टीका शाहांनी केली होती. शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली. याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत पलटवार केला.

सेलेब्रिटिंनी केलेल्या ट्विटचा घेतला समाचार

मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आंदोलनाबाबत सेलेब्रिटिंनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केले पाहिजे, यावर सेलिब्रिटिंनी आता कुठे शुद्ध आली आहे. मूळ म्हणजे शेतकरी 60 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानापासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतजमिनी हिसकावण्याचा प्रयत्न व्हायला नको, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. पण मग्रूर सरकार त्यांच्याशी बोलणी करायला तयार नाही. उलटपक्षी तुम्ही आमच्याकडे या, मग चर्चा करू, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र, जो मूळ पाया आहे. जो पाठीचा कणा आहे, त्याच्या दरवाज्यात जायला हवे, असे मला वाटत असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.

अमित शाह काय म्हणाले होते?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे. बाळसााहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत आल्याची टीका अमित शाह यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा अमित शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असे त्यांनी सांगितले.

हसन मुश्रीफांचा अमित शाहांवर पलटवार

हसन मुश्रीफ म्हणाले की, अमित शाह यांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं वक्तव्य हे वैफल्यातून आलं आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही, हे समजल्यामुळेच ते आता तक्रारी करत आहेत. अमित शाह यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. मुश्रीफ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत अमित शाह यांनी आश्वासन दिलं ते खरं असावं. कारखानदारांच्या बाबतीत शाह इतकं धादांत खोटं बोलत असतील तर शिवसेना आणि भाजपमध्ये काय झालं असेल? त्याबाबतही शाह खोटंच बोलत असतील. शिवाय शाहांना वाटलं नसेल की, शिवसेना कठोर होईल आणि युती तोडेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

संबंधित बातम्या

अमित शाहांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य वैफल्यातून; हसन मुश्रीफांचा टोला

शेतकऱ्यांचा भारत बंद, अमित शाहांची शेतकरी नेत्यांबरोबर तातडीची बैठक

( Shivsena leader Gulabrao Patil Slams Home minister Amit Shah at Jalgaon)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.