अमित शाहांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य वैफल्यातून; हसन मुश्रीफांचा टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती.

अमित शाहांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य वैफल्यातून; हसन मुश्रीफांचा टोला
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 2:14 PM

कोल्हापूर : भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (7 जानेवारी) सिंधुदुर्गमध्ये आले होते. यावेळी अमित शाह (Amit Shah) यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपमध्ये त्रास होणार नाही, त्यांचा योग्य तो सन्मान होईल, असे आश्वासन दिले. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळातील महाविकासआघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच भाजपने युतीधर्म पाळला, कोणतेही वचन मोडले नाही, उद्धव ठाकरे हेच ढळढळीत खोटं बोलत असल्याची टीका अमित शाह यांनी केली. दरम्यान, शाह यांना महाविकास आघाडीचे नेते आता प्रत्युत्तर देत आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांनी शाह यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील शाह यांच्यावर टीका केली आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले की, अमित शाह यांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं वक्तव्य हे वैफल्यातून आलं आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही, हे समजल्यामुळेच ते आता तक्रारी करत आहेत. अमित शाह यांनी आरोप केला आहे की, भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात आहे, परंतु तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं. त्यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थक हमी दिली आहे. कोणतीही गटबाजी केलेली नाही. भाजपच्या एका तरी कारखानदाराने सांगावं की त्यांना त्रास दिला जातो, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत. कदाचित त्या कारखानदारांना अमित शाह यांच्याकडून पैसे घ्यायचे असतील, म्हणूनच त्यांनी हा बेबनाव सुरु केला आहे.

अमित शाह यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. मुश्रीफ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत अमित शाह यांनी आश्वासन दिलं ते खरं असावं. कारखानदारांच्या बाबतीत शाह इतकं धादांत खोटं बोलत असतील तर शिवसेना आणि भाजपमध्ये काय झालं असेल? त्याबाबतही शाह खोटंच बोलत असतील. शिवाय शाहांना वाटलं नसेल की, शिवसेना कठोर होईल आणि युती तोडेल.

अमित शाह यांच्या भाषणातील पाच ठळक मुद्दे

‘शिवसेनेने बाळासाहेबांच्या सिद्धांतांना तिलांजली दिली’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे. बाळसााहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत आल्याची टीका अमित शाह यांनी केली.

‘भाजपमध्ये नारायण राणेंवर अन्याय होणार नाही, त्यांचा सन्मान होईल’

भाजप खासदार नारायण राणे यांच्या छबीचं लोक अनेकप्रकारे वर्णन करतात. मात्र, माझ्या मते, नारायण राणे जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेसाठी लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली.

मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि त्यांचा सन्मान कसा करायचा, हे भाजपला ठाऊक असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

‘मी बंद खोलीत काहीच करत नाही, जे करायचं ते सगळ्यांसमोर करतो’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा अमित शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही वचन तोडलं. आम्ही वचन पाळणारे लोक आहोत. आम्ही असं ढळढळीत खोटं बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही ठरल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी भाजपचा मुख्यमंत्री करा असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘निसर्ग चक्रीवादळावेळी मुख्यमंत्री कोकणात फिरकलेही नाहीत’

कोकणात निसर्ग वादळ आलं. मुख्यमंत्री या भागात किती वेळा आले. एकदाही नाही. पण देवेंद्र फडणवीस तीन वेळा आले. त्यांच्याकडून मी वादळाची माहिती घेत होतो. त्यांनी काजूच्या बागांनाही भेटी दिल्या. आमची जनतेशी बांधिलकी आहे.

पण या सरकारची ती राहिली नाही. हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 75 टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यात तीन पक्षाची आघाडी असूनही हा कौल मिळाला आहे. त्यावरून जनता कुणाच्या पाठी आहे हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.

तीन पायांची ऑटो रिक्षा

महाराष्ट्रातील नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा अनादर करण्यात आला. एक अपवित्र आघाडी करुन सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन झालं. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता. पण महाराष्ट्रात ऑटोरिक्षाचं सरकार आले, अशी टीका अमित शाह यांनी केली.

संबंधित बातम्या:

शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, अजित पवारांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर

राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीत, त्यांच्यावर अन्याय होणार नाही : अमित शहा

अमित शाहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी: चंद्रकांत पाटील

उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं; राणेंची जोरदार बॅटिंग

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.