
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा लाव्हा उसळला. ते सर्व पंतप्रधान मोदींनी पाहिलं. आपण जर माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावं लागेल हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी काल राजकीय माफी मागितली. उद्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितली, ही फक्त ‘राजकीय माफी’ होती अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांनी माफी मागितली असली तरी मविआने जाहीर केलेल्या जोडे मारो आंदोलनात कोणताही बदल होणार नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम, महाराष्ट्राविषयी प्रेम, आत्मियता नाही. पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो. पंतप्रधानांनी मागितलेली माफी पूर्णपणे राजकीय, या संकटातून सुटका करण्यासाठी हे (माफीचं) पाऊल उचललं. पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही असे ते म्हणाले. छ. शिवरायांची मागितलेली माफी हा राजकीय विषय आहे. ती माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, असं त्यांना वाटलं असेल. त्यातूनच ही माफी मागितली गेली. पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे लवकरच कळेल.
तर महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही
छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम, महाराष्ट्राविषयी प्रेम, आत्मियता नाही. पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो. पंतप्रधानांनी मागितलेली माफी पूर्णपणे राजकीय, या संकटातून सुटका करण्यासाठी हे (माफीचं) पाऊल उचललं. पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही असे ते म्हणाले. छ. शिवरायांची मागितलेली माफी हा राजकीय विषय आहे. ती माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, असं त्यांना वाटलं असेल. त्यातूनच ही माफी मागितली गेली. पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे लवकरच कळेल, असं राऊत यांनी खडसावून सांगितलं.
मविआचं आंदोलन सुरूच राहणार
छ. शिवरायांचा घोर अपमान महाराष्ट्रात,सरकारकडून झालाय. मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे. मोदींनी त्यांचं काम केलं, पण महाराष्ट्रही त्याचं काम करेल, कर्तव्य पार पाडेल. मोदींनी माफी मागितली असली तरी उद्यापासून राज्यभरात सरकारला जोडे मारो आंदोलनात कोणताही बदल होणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
आरोपींना अटक कोण करणार ?
राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी शिवरायांच्या अपमानानंतर भूमिका घेतली की दोषींनी शिक्षा करू. पण या दुर्घटनेसाठी जे जबाबदार आहेत त्यांचा तपास कोण करणार, आरोपींना अटक कोण करणार ? शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली ? त्यांची नाव कधी समोर येणार ? सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केलं, दुर्घटनेनंतर त्यांचा राजीनामा कोण घेणार असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
या पुतळ्यामागचं ठाणे कनेक्शन आहे, त्या कनेक्शनचा सूत्रधार मंत्रीमंडळात आहे, त्यांचा राजीनामा कोण मागणार, असा सवाल विचारत त्यांनी मुख्यंंमंत्र्यांवरही हल्ला चढवला. नुसत्या माफीने प्रश्न सुटत नाहीत, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही
छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन काँग्रेसला घेरले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला जातो. परंतु त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते कोर्टात गेले, असे म्हणत मोदींनी राहुल गांधी यांचे नाव न घेता काँग्रेसवर हल्ला चढवला होता.
त्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, छ. शिवरायांची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. म्हणून तर म्हणतो की ही राजकीय माफी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.