AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दिल्लीत आप व काँग्रेस एकमेकांना संपवायलाच लढले आणि त्यातच…” सामनातून कानपिचक्या

"जे मोदी आज केजरीवाल यांना दोष देत आहेत त्या मोदींनी अण्णांचे कोणते विचार पुढे नेले?" असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

दिल्लीत आप व काँग्रेस एकमेकांना संपवायलाच लढले आणि त्यातच... सामनातून कानपिचक्या
खासदार संजय राऊत
| Updated on: Feb 10, 2025 | 9:36 AM
Share

“दिल्लीत आप व काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले. त्यात मोदी-शहांचे फावले. हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्याच कशाला? मनसोक्त भांडा! महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालाने कोणी बोध घेणार नसतील तर हुकूमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचे पुण्य पदरी पाडून घ्या व त्यासाठी गंगास्नानाचीही गरज पडणार नाही!”, अशा शब्दात सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका केली. “जंतर मंतर, रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी कठोर आत्मक्लेश केले व अण्णांच्या आंदोलनामुळे तेव्हाचे काँग्रेसप्रणीत सरकार हादरले. मोदी व त्यांचे लोक सत्तेवर येण्यात अण्णांच्या आंदोलनाचा वाटा होता, पण जे मोदी आज केजरीवाल यांना दोष देत आहेत त्या मोदींनी अण्णांचे कोणते विचार पुढे नेले?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय?

दिल्लीतील निकालासंदर्भात दोन प्रतिक्रिया लक्षवेधी आहेत. पहिली जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची व दुसरी अण्णा हजारे यांची. राळेगणच्या अण्णा हजारे यांना महात्मा अण्णा बनविण्यात केजरीवाल व त्यांच्या लोकांचा मोठा वाटा आहे. अण्णा देशाला माहीत झाले ते केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध उभ्या केलेल्या राष्ट्रीय आंदोलनामुळे. हजारे यांना दिल्ली दाखवली ती केजरीवाल-सिसोदिया यांनी व त्याच दिल्लीचा पुढे राजकीय ताबा केजरीवाल यांनी घेतला. केजरीवाल यांनी किमान दहा वर्षे पंतप्रधान मोदी यांना दिल्लीच्या मैदानावर झुंजवले व शहा-मोदींच्या राजकारणाचा पराभव केला. आता अखेर अनेक उपद्व्याप करून मोदी-शहांना विजय मिळवता आला. केजरीवाल व आम आदमी पक्षाचा पराभव झाला याचा आनंद अण्णा हजारे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय, अशी टीका सामनातून करण्यात आली.

अण्णा म्हणतात, ‘‘अरविंद केजरीवालांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नाही. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले.’’ अण्णा हजारे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. अण्णांनी केलेल्या आमरण उपोषणातून जो अग्नी निर्माण झाला त्या ज्वालेतून केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा उदय झाला व आता त्याच हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ‘‘केजरीवाल यांना जनतेने अजिबात मतदान करू नये,’’ असे आवाहन केले होते. जंतर मंतर, रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी कठोर आत्मक्लेश केले व अण्णांच्या आंदोलनामुळे तेव्हाचे काँग्रेसप्रणीत सरकार हादरले. मोदी व त्यांचे लोक सत्तेवर येण्यात अण्णांच्या आंदोलनाचा वाटा होता, पण जे मोदी आज केजरीवाल यांना दोष देत आहेत त्या मोदींनी अण्णांचे कोणते विचार पुढे नेले? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

खोटेपणा, अहंकार, अराजकता, कपट आणि भ्रष्टाचाराचे शीशमहल उद्ध्वस्त केल्याचे मत गृहमंत्री अमित शहांनी मांडले. ते विधान गमतीचे आहे. हे सर्व दुर्गुण सगळ्यात जास्त भाजपच्या धमन्यांत भरले आहेत. कपट आणि भ्रष्टाचाराच्या कुबड्यांवर मोदींचा अमृतकाल टिकून आहे व हजारे फक्त केजरीवाल यांच्या नावाने टोपीवर हात फिरवीत बसले आहेत. महाराष्ट्रात व देशभरात सर्व ‘दस नंबरी’ भ्रष्टाचारी एकत्र करून मोदी-शहा त्यांचे राज्य चालवत आहेत. मोदी राज्यात देश लुटणाऱ्यांना अभय आहे, भ्रष्ट पैशांच्या ताकदीवर घाऊक पक्षांतरेही सुरू आहेत हे काय अण्णा हजारे यांना दिसत नाही? राफेलपासून हिंडेनबर्गपर्यंत अनेक घोटाळे समोर येऊनही अण्णा हजारे यांनी सुस्कारा सोडला नाही. जणू काही मोदी राज्यात विचार, चारित्र्याचा पूरच आला आहे व त्या पुरात महाराष्ट्रात ठाकरे यांचे आणि दिल्लीत केजरीवालांचे राज्य वाहून गेले. माणसाने ढोंग तरी किती करावे? असा सवाल संजय राऊतांनी केला.

काँग्रेसने 14 ठिकाणी ‘आप’च्या पराभवास हातभार लावला. हरयाणातदेखील तेच झाले. ‘आप’शी भांडून शेवटी काँग्रेसच्या हाती काय लागले? काँग्रेस पक्षात अशा काही सुप्त शक्ती आहेत काय, ज्यांना राहुल गांधींच्या प्रतिष्ठेला नेहमीच तडे द्यायचे आहेत? ‘आप’ला विजयी करण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही असे काँग्रेसचे नेते म्हणत असतील तर ते चूक आहे व हा एक प्रकारचा अहंकार आहे. मग काय मोदी-शहांच्या हुकूमशाहीला विजयी करण्याची जबाबदारी ही आपापसात लढणाऱ्यांची आहे? दिल्लीतील निकालाचा फटका लोकशाहीला बसणार आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले, असेही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?