AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत, योगेश कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत भडकले

स्वारगेट येथे तरूणीवर अत्याचार करणाा आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताल मध्यरात्री अटक केली. पण या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले का ? असा सवाल राऊत यांनी विचारला

Sanjay Raut : गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत, योगेश कदमांच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊत भडकले
संज राऊत संतापलेImage Credit source: TV9
| Updated on: Feb 28, 2025 | 10:14 AM
Share

पुण्यातील सवारगेट बस स्थानकाच्या परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाला. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. तरूणीवर अत्याचार करणाा आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताल मध्यरात्री अटक केली. पण या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले का ? असा सवाल राऊत यांनी विचारला. एवलढंच नव्हे तर या अत्याचार प्रकरणावरून बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानामुळेही राऊत संतापले असून त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. ” आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत ” अशा शब्दांत राऊतांनी कदम यांच्यावर टीका केली. कदम यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

संजय राऊत संतापले

माध्यमांशी संवाद साधतान संजय राऊतांनी सरकारवर तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर टीकेची झोड उठवली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली, म्हणजे फार उपकार केले का ? आमचे ग-हराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. ते म्हणतात की आतमध्ये ( बस) हाणामारी झाली, शांतपणे बलात्कार पडला, त्यामुळे बाहेर कळलं नाही, ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. एका महिलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग, बलात्कार होतो, आणि तिने स्ट्रगल केलं नाही , हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केलं नाही त्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही. तिचा गळा दाबला, तेोंड दाबलं, तिच्यावर जबरदस्ती केली.आणि हे काय बोलतात, असं म्हणत राऊतांनी कदमांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

कायद्याचा धाक नाही का?

पुण्यामध्ये या गोष्टी घडत आहेत, इथले पालकमंत्री अजित पवार आहे, त्यांना सगळे दादा म्हणतात. मग पुण्यातच या गोष्टी का घडत आहेत? असा सवाल विचारत कायद्याचा धाक उरलेला नाही , पोलिसांची भीती राहिलेली नाही, असा आरोप राऊतांनी केला पोलिस असो की कायदा, आम्ही कसंही मॅनेज करू असा विश्वास करू शकतो असा विश्वास गुंडांमध्ये आहे. न्यायालयात हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे. राजकीय वरद हस्त लाभलेले हे गुन्हेगार मोकाट फिरतात . गुन्हेगार हे कोणाचे नसतात कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात , असेही राऊत म्हणाले. ठाण्यातील बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडली, त्यातील अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या, आता निवडणुका नाहीत. तो ठाणे जिल्हा होता, आता पुणे जिल्हा आहे”, असं आरोप करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.