AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीत मनसे महाविकास आघाडीसोबत येणार?; संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया काय?

महाराष्ट्रातील येणाऱ्या महापालिका निवडणुकांवरून राजकीय चर्चा रंगत आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि मनसेच्या एकत्रित लढतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. स्थानिक पातळीच्या निवडणुकांसाठी वेगळी समीकरणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिका निवडणुकीत मनसे महाविकास आघाडीसोबत येणार?; संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया काय?
sanjay raut mns alliance
| Updated on: Jul 10, 2025 | 12:45 PM
Share

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर युती, आघाडी याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने सध्या राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत लढणार का, या प्रश्नावर राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणितं आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, तर कधी स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या लागतात, असे संजय राऊत म्हणाले.

लोकसभेला आम्हाला चांगले यश

“अशा प्रकारच्या बातम्या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत. लोक असे विचारतात इंडिया आघाडीचे भविष्य काय? आम्ही जेव्हा सन्माननीय राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड जल्लोष झाला त्याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडला यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे इंडिया आघाडी जे तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाले होते. आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, आम्हाला चांगले यश मिळालं.” असे संजय राऊतांनी नमूद केले.

महाविकास आघाडीतून कोणीही बाहेर पडलेलो नाही

“लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही. ही खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अनेक नेत्यांसमोर व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीचा विषय हा राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी या संदर्भात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे प्रामुख्याने आहेत. आम्ही विधानसभा निवडणुका लढलो. आम्ही महाविकास आघाडीतून कोणीही बाहेर पडलेलो नाही, आम्ही आजही त्याचे घटक आहोत आणि महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्र घेतले जातील”, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेसाठी स्थानिक पातळीवर वेगळ्या आघाड्या कराव्या लागतात

“आता राहिला विषय महानगरपालिका निवडणुकांचा. या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की, महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील का? स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणितं आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, तर कधी स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या लागतात”, असे संजय राऊत म्हणाले.

“मला जेव्हा याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा मी इतकंच सांगितलं की, आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण ५ तारखेला पाहिला असेल. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे, खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या, असा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.