AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिंदे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो आणि थोडं काय झालं की…”, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल. आपली लढाई मुंबईसाठी आहे, ती लढाई जिंकायची. मराठी माणसाची ताकद, आपल्याला दाखवा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

शिंदे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो आणि थोडं काय झालं की..., उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
| Edited By: | Updated on: Jun 16, 2025 | 12:35 PM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील शिवसेना भवनात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंनी शिंदे गटाला ‘चिंधीचोर मिंधे’ असे म्हणत त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल, असे आवाहन केले.

मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘चिंधीचोर मिंधे’ असे संबोधले. “चिंधीचोर मिंधे भाजपसोबत गेला, मी ठरवलं असतं तर भाजपसोबत गेलो असतो, पण मला भाजप विरोधात लढायचं आहे,” असे ठाकरे म्हणाले. शिंदे यांच्या दरे येथील भेटीवरूनही त्यांनी टोला लगावला. “मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो… घरगड्याची शेती बघा शेतीत हेलिकॉप्टर संपत्ती मालकापेक्षा जास्त… थोडं काय झालं की गावाला जाऊन बसतो,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर उपरोधिक टीका केली.

मुंबई अदानीच्या घशात घालू द्यायची नाही

“जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा मुंबई महानगरपालिकेत जीव अडकला आहे. हाच भाजप आणि मिंधे मुंबई अदानीच्या घशात घालू पाहत आहे, पण आपण मुंबई अदानीच्या घशात घालू द्यायची नाही. त्यासाठी लढाई लढायची आहे,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. ही लढाई मुंबईसाठी असून ती जिंकायचीच असे ते म्हणाले. मराठी माणसाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. आता आपण काँग्रेससोबत आहोत. ठीक आहे. पण एकेकाळी नेहरूंना वाकवणारा हा महाराष्ट्र आहे”, याची आठवण त्यांनी करून दिली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आपल्या आजोबांच्या योगदानाचा संदर्भही दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी माझ्या आजोबांनी आंदोलन केलं, त्यांचा मी नातू आहे. मी मुंबईसाठी लढाई लढणार आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल

सध्याच्या राजकीय समीकरणावर बोलताना, “आता आपण काँग्रेस सोबत आहोत ठीक आहे. पण एकेकाळी नेहरुंना वाकवणारा हा महाराष्ट्र आहे. मोरारजी देसाई यांना देखील आपण वाकवलं होतं,” अशी आठवणही त्यांनी करून दिली. भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद आपल्याला दाखवावी लागेल. आपली लढाई मुंबईसाठी आहे ती लढाई जिंकायची आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत आपल्याला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मराठी मतदारांना एकजुटीचे आवाहन केले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार