AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड हादरलं! अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांचा पोलिसांवरच गंभीर आरोप, वाचा काय घडलं

Beed News : बीडच्या शिरूरमधील एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय. तोंडावर स्प्रे मारत अल्पवयीन मुलीचे तिच्या घराजवळून अपहरण करण्यात आले. पालकांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडालीये.

बीड हादरलं! अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांचा पोलिसांवरच गंभीर आरोप, वाचा काय घडलं
Beed
| Edited By: | Updated on: Jul 27, 2025 | 8:55 AM
Share

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा तूफान चर्चेत आला. बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसली. आता त्यामध्येच बीडच्या शिरुरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करत हातपाय बांधून शेतात टाकले. दरम्यान मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचीही माहिती मिळतंय. मुलीच्या आई वडिलांनी गंभीर आरोप केली आहेत. गतवर्षापासून असा प्रकार दोनदा घडल्याचा दावा पालकांनी केला. मात्र, याकडे पोलिस हे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप त्यांचा आहे.

तोंडावर स्प्रे मारत अल्पवयीन मुलीचे घराजवळून अपहरण 

अधिक माहिती अशी की, बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील वडाळी गावामध्ये अल्पवयीन मुलीचे घराजवळून अपहरण करत तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे गतवर्षी देखील दोन वेळा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी देखील पालकांनी तक्रार केली होती, परंतु पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तिसर्‍यांदा हा प्रकार घडला.

यापूर्वीही दोनदा घडला होता अपहरणाचा धक्कादायक प्रकार 

ही मुलगी घराच्या पाठीमागील बाजुस थांबलेली असताना समोरुन आलेल्या दोघांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला. यानंतर तिला गुंगी आल्यासारखे झाले. त्यानंतर त्या दोघांनी तिला ओढत नेवून जवळच्या शेतात बांधून टाकल्याचे तसेच तिचा विनयभंग देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात देखील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या पालकांनी केला पोलिसांवरच गंभीर आरोप 

किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे. मात्र, बीडमधील या प्रकारानंतर संताप हा व्यक्त केला जातोय. पोलिसांनी दोन वेळा मुलीचे अपहरण झाल्यानंतर कारवाई का केली नाही, पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे, अशी असंख्य प्रश्न यादरम्यान उपस्थित केली जात आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आली. वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.