AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत हायअलर्ट, नौदलाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात तो आला आणि चक्क जवानाची रायफल आणि काडतुसे घेऊन..

मुंबईच्या कुलाबा भागात एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये, ज्यानंतर खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून नौदलाकडून चाैकशीसाठी समिती देखील गठीत करण्यात आली. मात्र, अजूनही काही माहिती मिळत नाहीये.

मुंबईत हायअलर्ट, नौदलाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात तो आला आणि चक्क जवानाची रायफल आणि काडतुसे घेऊन..
Mumbai
| Updated on: Sep 09, 2025 | 11:47 AM
Share

मुंबईत एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. मुंबईतील कुलाबा येथे एका अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या जवानाची रायफल आणि काडतुसे थेट पळून नेली. 6 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. या घटनेने आता मुंबईत थेट अलर्ट जारी करण्यात आलाय. यंत्रणा सर्तक झाल्या असल्याचे बघायला मिळतंय. ATS  हायअलर्ट मोडवर असून तपास केला जातोय. भारतीय नौदलाचा गणवेश घातलेल्या एका व्यक्तीने नेव्ही नगरच्या भागात ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीरला फसवले. त्याने चक्क अग्निवीरचे रायफल आण काडतुसे पळवली.

मिळालेली अधिक माहिती अशी की, नेव्हीच्या गणवेशात आलेल्या व्यक्तीने ड्युटीवर असलेल्या अग्निवीरला सांगितले की, तुझी ड्युटी संपली आहे. तू आराम कर. त्याने अग्निवीरच्या हातातील रायफल घेतली. अग्निवीरला त्या व्यक्तीची ओळख नव्हती. त्याला वाटले की, हा नेव्हीतील नवीन अधिकारी आहे, तो नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात असल्याने त्याला अजिबातच संशय आला नाही. मात्र, रायफल घेऊन काही वेळातच या व्यक्तीने पळ काढला.

काही वेळातच त्या अग्निवीरला समजले की, तो व्यक्ती नौदल अधिकारी नसून घुसखोर आहे. या घटनेची माहिती लगेचच अधिकाऱ्यांना देण्यात आली. या घटनेमुळे नौदल, एटीएस आणि मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. ज्याठिकाणी हा प्रकार घडला, तिथे सर्च मोहिम राबवली गेली. मात्र, अजून तरी काही माहिती या प्रकरणात मिळाली नाहीये. मुंबई पोलिस आणि भारतीय नौदल मिळून या प्रकरणात तपास करत आहे. कफ परेड पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार, गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेच नाही तर या प्रकरणी चाैकशी करण्यासाठी नौदलाकडून एक समिती तयार करण्यात आलीये. घुसखोर त्या जवानापर्यंत नेमका पोहोचला कसा आणि त्याच्याकडून  नौदलातील अधिकाऱ्याचा गणवेश करा आला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रित बाबीनुसार सध्या तपास सुरू असल्याची माहित मिळतंय. मात्र, चक्क नौदल अधिकारी बनून एक व्यक्ती आला आणि त्याने रायफल पळून नेली, याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवल्याचेही माहिती मिळतंय.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?