AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले, त्यांनाच Uddhav Thackeray वाचवत आहेत; श्वेता महालेंचं खळबळजनक विधान

शिवसेनेचं (shivsena) हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस (Congress) बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली, असं वादग्रस्त विधान भाजपच्या आमदार श्वेता महाले (shweta mahale) यांनी केलं आहे.

ज्या नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले, त्यांनाच Uddhav Thackeray वाचवत आहेत; श्वेता महालेंचं खळबळजनक विधान
ज्या दिवशी शिवसेना Congressबरोबर सत्तेत बसली त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली, श्वेता महालेंची टीकाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 8:34 AM
Share

बुलडाणा: शिवसेनेचं (shivsena) हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस (Congress) बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली, असं वादग्रस्त विधान भाजपच्या आमदार श्वेता महाले (shweta mahale) यांनी केलं आहे. हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे. त्यामुळेच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको, असंही त्या म्हणाल्या. ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे. सध्या शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे, अशी टीका त्यांनी केली. त्या टीव्ही9 मराठीशी बोलत होत्या.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे आपण हिंदुत्व सोडलं असं होत नाही. आम्ही अजूनही हिंदुत्ववादी आहोत. आमचं हिंदुत्व कायम आहे. उलट भाजपचं हिंदुत्व ढोंगी आहे. सत्तेसाठी भाजप हिंदुत्वाला विसरली आहे. हिंदुत्ववादी मित्र पक्षांना विसरली आहे, अशी टीका शिवसेनेने वारंवार केली आहे. तर सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजपकडून सेनेवर करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी दाऊदच्या हस्तकांसोबत जमिनीचा व्यवहार केल्यानंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला अधिकच घेरलं होतं. त्यातच आता श्वेता महाले यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. ज्या नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला,  त्याना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले, अशी टीकाही महाले यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना महाले यांना काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत श्वेता महाले?

श्वेता महाले यांनी चिखलीतील जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी सभापती असताना सर्कलसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विभागातील कामे केली होती. या मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर त्या थेट विधानसभेसाठी उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या. महाले यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्चपदावर आहेत. त्यांच्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर त्यांनी 2014मध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यावेळी त्यांची संधी हुकली. मात्र, 2019मध्ये संधी मिळताच त्यांनी या संधीचं सोनं केलं.

बुलडाण्यातील चिखली मतदारसंघात 15 वर्षापासून कमळ फुलले नव्हते. भाजपचा हा वनवास श्वेता महाले यांनी संपवला. महाले यांना भाजपने 2019मध्ये चिखलीतून उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे राहुल बोंद्रे उभे होते. बोंद्रे या मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाले या 6 हजार 851 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांना 92 हजार 205 मते मिळाली. तर बोंद्रे यांना 85 हजार 433 मते मिळाली. त्यामुळे 2004नंतर भाजपला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळविता आला.

संबंधित बातम्या:

समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंग, आशा वर्करांसमोर पेच; Chitra Kishor यांची राज्यसरकारवर सडकून टीका

SHEGAON मध्ये पंकजा मुंडेनी मध्यरात्री घेतला चहाचा आस्वाद, कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण

Maharashtra News Live Update : Harbour Line वरती आज मेगाब्लॉक, जाणून घ्या दिवसभरातलं रेल्वेचं वेळापत्रक

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.