AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Alert: सिंधुदुर्गमधील बांद्यातील पूरग्रस्त भागात 24 तास अलर्ट रहा; भाजपा नेते आशिष शेलार आणि आमदार नितेश राणेंच्या प्रशासनाला सूचना

आपत्ती व्यवस्थापनची टीम याठिकाणी कार्यरत ठेवावी तसेच रेस्क्यूसाठी अतिरिक्त साहित्य लागल्यास तात्काळ उपलब्ध करा अशा सूचना भाजप नेते तथा आमदार ॲड आशिष शेलार व आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Rain Alert: सिंधुदुर्गमधील बांद्यातील पूरग्रस्त भागात 24 तास अलर्ट रहा; भाजपा नेते आशिष शेलार आणि आमदार नितेश राणेंच्या प्रशासनाला सूचना
| Updated on: Jul 05, 2022 | 8:09 PM
Share

सिंधुदुर्ग: मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. ज्या प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आढावा घेतला त्याच प्रमाणे राज्यातील भाजपच्या नेत्यांनीही पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्यांनी बांदा शहराला भेट दिली. बांद्यासर परिसरातील (Banda Heavy Rain) गावामधून जोरदार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार ॲड शेलार व आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सायंकाळी बांदा शहराला भेट देत पुरस्थितीची माहिती घेतली.

बांदा शहरासह परिसर पूरग्रस्त

बांदा शहर व परिसर हा पूरग्रस्त असल्याने शहरात प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने 24 तास अलर्ट राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितेल आहे. पुरस्थिती उद्भवल्यास प्रसंगी स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी.

आपत्ती व्यवस्थापनची टीम कार्यरत

त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनची टीम याठिकाणी कार्यरत ठेवावी तसेच रेस्क्यूसाठी अतिरिक्त साहित्य लागल्यास तात्काळ उपलब्ध करा अशा सूचना भाजप नेते तथा आमदार ॲड आशिष शेलार व आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ॲड शेलारांचीही भेट

पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार ॲड शेलार व राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सायंकाळी बांदा शहराला भेट देत पुरस्थितीची माहिती घेतली. यावेळी सावंतवाडी प्रांतधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, महसूल नायब तहसीलदार मनोज मुसळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, मंडळ अधिकारी आर.वाय. राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी, सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच उदय धुरी, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, राजेश विरनोडकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरु सावंत, पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई , मधुकर देसाई, विनेश गवस, शाम सावंत, सुनील धामापूरकर आदी उपस्थित होते.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.