धनंजय मुंडेंना नॅशनल अवॉर्ड दिला पाहिजे, अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
नुकताच अंजली दमानिया यांनी अजित पवारांसह धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीये. धनंजय मुंडे हे शासकीय बंगला सोडत नसल्याने त्यांनी टीका केली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दमानिया या आग्रही होत्या आणि त्यांनी अनेक गंभीर आरोपही केली होती.

सूरज चव्हाण यांना दिलेल्या नवीन जबाबदारीबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या दिसल्या आहेत. अंजली दमानिया म्हणाल्या की, मला असं वाटतं की, ज्या पक्षाने 23 दिवसांपूर्वी त्यांच्यावर कारवाई केली होती आणि का आता त्यांनी अतिशय चुकीचं वर्तन केलं जे न शोभणारं होतं, असं सांगून ज्यांच्यावर कारवाई केली त्या सूरज चव्हाण यांना युवक अध्यक्षपदावरण सरचिटणीस पद जर मिळालं तर अजित पवारांच्या शब्दांवर आता लोक विश्वास कसा ठेवणार.
अजित पवार आताच म्हणजे तीन आठवड्यापूर्वी जे म्हणतात की, त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही करतोय आणि पदावर घेतात गंमतच आहे. म्हणजे यांच्या शब्दावर आता याच्यापुढे विश्वास ठेवायचे की नाही. राष्ट्रवादीत सगळ्यांवरच गुन्हे आहेत सगळ्यांवरच आरोप आहेत सगळ्यांवरच गुंडागर्दीचे आरोप आहेत. फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणायचे की, त्यांना सिंचन घोटाळा चक्की पिसिंग अँड पिसिंग.
छगन भुजबळ यांच्या सुनावणीबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या की, छगन भुजबळ विरुद्ध आम्ही जे सात स्कॅम त्यांनी केले होते त्याची सगळी माहिती काढून आम्ही लढत होतो. त्याच्यापैकी एका केसमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये त्यांनी डिस्चार्ज पेटिशन फाईल करून ते पण कोविड काळात त्यांनी डिस्टर्बिटेशन सेशन कोर्टात फाईल करून त्यात ते त्यांना डिस्चार्ज मिळाला होता, त्याच्यावर मी रिव्ह्यू फाईल केलं. त्याचा आज हेअरिंग आहे.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल म्हणाल्या की, एक तर मला असं वाटतं धनंजय मुंडे जेव्हा आधी म्हणाले ते धादांत खोटं बोलले आधी म्हणाले की, माझे मुंबईत घर नाही म्हणून मला सातपुडा बंगल्यात राहायचं. मला आजारपण आहे आणि त्याच्यात मुंबई त्यांचं घर आहे त्यांना आजारपण नाही. फक्त चार आठवड्यांपुरताच तो प्रॉब्लेम असतो तो केल्यानंतर बरा होतो. धनंजय मुंडे खोटं बोलतात इतका ड्रामा करतात, मला तर वाटतं त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे ड्रामॅटिकमध्ये.
