Ajit Pawar : अजित पवारांना भाजपाबद्दल सॉफ्ट कॉर्नर?, राज्यात जे दिसतंय, तेच सांगितलं..शरद पवारांनी काल कान टोचल्यावरही अजितदादा आज बंडाबाबत काय म्हणाले?

शरद पवारांनीही कान टोचल्यानंतरही, याबाबत शुक्रवारी अजित पवारांना विचारले असता, त्यांनी आपल्याला राज्यात जे दिसते आहे त्यावरुन विधान केले होते असे सांगितले. मात्र शिंदे यांच्या बंडामागे भाजपा आहे, हे मात्र त्यांनी मान्य केलेले नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या मनात भाजपाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांना भाजपाबद्दल सॉफ्ट कॉर्नर?, राज्यात जे दिसतंय, तेच सांगितलं..शरद पवारांनी काल कान टोचल्यावरही अजितदादा आज बंडाबाबत काय म्हणाले?
शरद पवार, अजित पवार
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jun 24, 2022 | 5:19 PM

मुंबई- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर शिवसेनेतील मोठा गट फुटून गुवाहटीत गेला आहे. या बंडाच्या मागे भाजपा असल्याची चर्चा आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मात्र तसे वाटत नाहीये, गुरुवारी त्यांनी हेच सांगितले आणि शुक्रवारीही त्यांनी या प्रश्नाचे उत्तर टाळले. गुरुवारी त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शरद पवारांनी कदाचित अजित पवारांना राज्याबाहेरचे नेते माहित नसतील, असे सांगत या बंडामागे भाजपाचे नेते कसे आहेत, हे नावानिशी दाखवून दिले होते. शरद पवारांनीही कान टोचल्यानंतरही, याबाबत शुक्रवारी अजित पवारांना विचारले असता, त्यांनी आपल्याला राज्यात जे दिसते आहे त्यावरुन विधान केले होते असे सांगितले. मात्र शिंदे यांच्या बंडामागे भाजपा आहे, हे मात्र त्यांनी मान्य केलेले नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या मनात भाजपाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शुक्रवारी काय म्हणाले होते अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुरुवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, याबाबत अजित पवार यांना विचारले असता, आत्तातरी या बंडात राज्यातील भाजपाचा कोणताही बडा नेता दिसत नसल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यांनी कोणताही बडा नेता, हे दोन ते तीन वेळा आवर्जून सांगितले होते. राज्यात आपण जे नेते पाहतो, त्यातील कुणी या बंडाच्या मागे सध्यातरी दिसत नसल्याचा त्यांचा युक्तिवाद होता.

शरद पवार काय म्हणाले होते

अजित पवारांनंतंर शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यात हाच प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, अजित पवार हे राज्यातील नेते असल्याने, कदाचित सूरत आणि आसाममध्ये या बंडाच्या ठिकाणी कोणते नेते कार्यरत आहेत, याची माहिती अजित पवारांना नसावी. मात्र सूरतमध्ये गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील जे खासदार आहेत, ते यात असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या एका मुलाखतीत, त्यांनी आपल्यामागे एक राष्ट्रीय पक्ष आहे, असे सांगितल्याचा दावाही पवारांनी केला. सहा राष्ट्रीय पक्षांची यादी वाचवून दाखवत त्यांनी यामागे भाजपा नसेल तर कोण असेल, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता.

हे सुद्धा वाचा

२४ तासांनी पुरावे देऊनही अजित पवार विधानावर ठाम?

याबाबत काल आपल्याकडे जी माहिती होती, त्यावर आधारित उत्तर दिल्याचे अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. कालपर्यंत जे राज्यात पाहायला मिळत होते, त्याच्या आधारावर उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार हे आमच्या पक्षासाठी दैवत आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची आपली लायकी नाही असेही त्यांनी सांगितले. मात्र यात भाजपा बंडखोरांमागे आहे का या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळलेच.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें