AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाय बांधले, गाडीत कोंबलं अन् तलवारी घेऊन… पडळकरांच्या कार्यकर्त्याने सांगितला संपूर्ण घटनाक्रम, गौप्यस्फोटाने खळबळ

सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्या शरणू हांडे यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. अपहरणामागील कारण म्हणजे २०१७ च्या दगडफेकीच्या प्रकरणाचा बदला घेणे.

पाय बांधले, गाडीत कोंबलं अन् तलवारी घेऊन...  पडळकरांच्या कार्यकर्त्याने सांगितला संपूर्ण घटनाक्रम, गौप्यस्फोटाने खळबळ
Gopichand Padalkar sharnu hande Kidnaping
| Updated on: Aug 08, 2025 | 11:42 AM
Share

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपहरण झालेल्या कार्यकर्त्याला सुखरूप सोडवलं. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली. आता या घटनेनंतर शरणु हांडे यांनी नेमंक काय घडलं, याबद्दलची माहिती दिली.

शरणू हांडे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतंच त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद झाला. यावेळी त्यांना ही घटना नेमकी कशी झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? किती वाजता घडली, वेळ काय होती याबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी शरणू हांडे यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.

शरणू हांडे यांची प्रतिक्रिया 

“मी पानटपरी जवळ उभा होतो. अचानक एक गाडी आली आणि त्यातून काही लोक उतरले. त्यांनी थेट माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यांनी मला मारहाण केली. यानंतर गाडीत कोंबले. त्यानंतर माझे पाय बांधले. ते मला कुठेतरी घेऊन जात होते. ते एकूण सात लोक होते. त्यांच्या हातात कोयते, हॉकी स्टिक आणि तलवार अशी धारदार हत्यारं होती. गाडीतही मला सतत मारहाण करत होते. त्यामुळे मला कुठे घेऊन जात आहेत हे मला कळलं नाही.” असे शरणू हांडे यांनी म्हटले.

नेमकं काय घडलं?

हे अपहरण जुन्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचं समोर आलं आहे. आरोपी अमित सुरवसे याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. काही दिवसांपूर्वी याच घटनेचा बदला घेण्यासाठी शरणु हांडे यांनी अमित सुरवसेला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या अपमानाचा राग मनात ठेवूनच अमित सुरवसेने हे अपहरण करून बदला घेण्याचा कट रचला.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ चार पथके तयार केली. तसेच कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी केली. रात्री १० च्या सुमारास पोलिसांनी होर्टी गावाजवळ आरोपींना पकडण्यात आले. यावेळी शरणु हांडे गाडीत गंभीर जखमी अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सोलापूरला आणले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.