लॉकडाऊनमुळे तीन मुलं परराज्यात, सोलापुरात वृद्धेचा पतीला मुखाग्नी

व्यंकटय्या राजमल्लू वोद्दूल या 75 वर्षीय व्यक्तीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला, मात्र मुलं तेलंगणात अडकल्याने पत्नीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. (Solapur Lockdown Wife does Last Rights of Husband)

लॉकडाऊनमुळे तीन मुलं परराज्यात, सोलापुरात वृद्धेचा पतीला मुखाग्नी

सोलापूर : तीन मुलं लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकल्यामुळे सोलापुरात राहणाऱ्या वृद्धेनेच पतीला मुखाग्नी दिला. 75 वर्षीय व्यक्तीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. (Solapur Lockdown Wife does Last Rights of Husband)

‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. 25 एप्रिलला सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे फक्त राज्यच नाही, आंतरजिल्हा सीमाही सील करण्यात आल्या आहेत.

व्यंकटय्या राजमल्लू वोद्दूल या 75 वर्षीय व्यक्तीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तेलंगाणामध्ये सलून सांभाळणारी त्यांची तिन्ही मुलं तिथेच अडकली. मुलं अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित राहू शकणार नसल्याने मुखाग्नी कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला होता.

अखेर त्यांच्या 70 वर्षीय पत्नीनेच आपल्या वृद्ध पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. श्यामलव्वा व्यंकटय्या वोद्दूल यांनीच मुखाग्नी दिला.

हेही वाचा : ज्या डॉक्टरांसाठी टाळ्या वाजवल्या, त्यांच्यावरच हल्ला का? खासदार डॉ. अमोल कोल्हे व्यथित

वोद्दूल दाम्पत्याची मुले बालराज, कृष्णा, अनिल आणि सुनांनी तेलंगणातून व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून आपल्या पित्याचा अखेरचा निरोप घेतला. (Solapur Lockdown Wife does Last Rights of Husband)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *