AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अखेर रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा; कारण नमूद केले नाही; चौकशीचाही ससेमिरा मात्र मागे

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. 7 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे. या राजीनाम्यामध्ये त्यांनी कोणतेही कारण लिहिले नाही.

...अखेर रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा; कारण नमूद केले नाही; चौकशीचाही ससेमिरा मात्र मागे
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Jul 12, 2022 | 7:23 PM
Share

सोलापूर: ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी (Global Teacher Award winning teacher Ranjit Singh Disley) यांच्या अमेरिकेला पीएचडीसाठी (America Ph.D) जाण्यासाठीच्या रजेवरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात खुद्द राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्या सूचनेवरून अखेर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना रजेची मंजुरीही देण्यात आली होती. त्यामुळे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता, मात्र आता डिसले गुरुजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या राजीनाम्यामुळे.

महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्या अमेरिकेतील पीएचडीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी थेट हस्तक्षेप करून त्यांची रजा मंजूर करण्यात आली होती, तरीही आता त्यांनी अमेरिकेला जाण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र राजीनाम्याचे कारण नमूद करण्यात आले नाही.

राजीनाम्याचे कारण नाही

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. 7 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे. या राजीनाम्यामध्ये त्यांनी कोणतेही कारण लिहिले नाही.

 चौकशीचा ससेमिरा लागला

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर ॲवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला होता.

त्यावेळी मात्र त्यांनी माफीनामा दिला

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवण्यात आला होता. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवण्यात आला होता. कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. पण, त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजाही मिळाली होती. त्याचवेळी त्यांनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले होते, त्यावेळी मात्र त्यांनी माफीनामा दिला होता.

शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये कलगीतुरा

क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत करणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षांपूर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला होता. आता शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला आहे. त्यातूनच हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...