NCP-NDA: शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये? मंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे सूचक वक्तव्य, INDIA आघाडीचे वाढणार टेन्शन?

Sharad Pawar NCP-NDA: राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. काही भेटीगाठींमुळे तर्क-वितर्कही लढवले गेले. तर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी याविषयी एक सूचक वक्तव्य केले आहे. राजकारणाला त्यामुळे उकळी फुटली आहे. काय म्हणाले गोरे?

NCP-NDA: शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये? मंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे सूचक वक्तव्य, INDIA आघाडीचे वाढणार टेन्शन?
शरद पवार, नरेंद्र मोदी, जयकुमार गोरे
| Edited By: | Updated on: Jul 28, 2026 | 11:34 AM

Jaykumar Gore Big Statements: शरद पवार यांची राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (Sharad Pawar NCP-NDA) जाण्याच्या चर्चांना मध्यंतरी ऊत आला. त्यातच विविध भेटीगाठींमुळे तर्क-वितर्क लढवले गेले.  या वृत्तांची एकच चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनातच मोठी घडामोड होण्याचे दावे-प्रतिदावे करण्यात आले.  आता मंत्री जयकुमार गोरे यांनी याविषयावर एक सूचक वक्तव्य केल्याने राजकारणाला उकळी फुटली आहे. त्यांनी याप्रकरणी थेट भाष्य केले नसले तरी मोठे संकेत दिले आहेत. काय म्हणाले जयकुमार गोरे?

शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये?

राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होण्याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी सूचक विधान केले आहे. एनडीए म्हणून आम्ही एकसंध आहोत. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए मध्ये एखादा दुसरा पक्ष वाढतोय पण कमी होण्याची शक्यता नाही. काहीजण बातम्या चालवत आहेत आणखी काही ऍडिशन होणार आहे डिलिशन नाही, असे सूचक वक्तव्य मंत्री गोरे यांनी केले आहे. इशाऱ्यातूनच त्यांनी हे संकेत दिले आहेत.

भेटीगाठीचा घटनाक्रम, दाव्यात खराच दम?

जयंतराव पाटील- विनोद तावडे यांची भेट

भाजप नेते विनोद तावडे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यात 3 जुलै 2026 रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनौपचारिक भेट झाली. या भेटीमुळे शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला. पण जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एका कामानिमित्त ही भेट झाल्याचा खुलासा केला. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कामानिमित्त ही भेट असल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट

विनोद तावडे आणि जयंतराव पाटील यांच्या भेटीचा धुराळा खाली बसत नाही तोच 7 जुलै 2026 रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. विधानभवनातील शिंदेंच्या दालनात ही भेट झाली. यावेळी शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीनिमित्त ही भेट झाली आणि ती सदिच्छा भेट असल्याचे नंतर स्पष्टीकरण देण्यात आले. पण या भेटीने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. त्यावर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीने वेधले लक्ष

दिल्लीत गेल्या आठवड्यात जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटलेले असताना बुधवारी शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात ही भेट झाल्याचा दावा करण्यात येत होता. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर विविध दावे करण्यात येऊ लागले. तटकरे आणि शाह यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले तरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी ही भेट महत्त्वाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us