केंद्राकडून सूडनाट्य मात्र क्रियेला प्रतिक्रियेची मर्यादा पाळा, जयंत पाटलांचा नेत्यांना खोचक सल्ला

क्रिया प्रतिक्रिया जास्त उमटायला लागल्या आहेत . दोन्ही बाजूने त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत आणि सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये. अशा शब्दात आज जयंत पाटील यांनी राज्यात सुरु असलेल्या सूड नाट्यावर मार्मिक प्रतिक्रिया दिली .

केंद्राकडून सूडनाट्य मात्र क्रियेला प्रतिक्रियेची मर्यादा पाळा, जयंत पाटलांचा नेत्यांना खोचक सल्ला
जयंत पाटील यांचा भाजपला इशाराImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 7:45 PM

सागर सुरूवसे, प्रतिनिधी, सोलापूर : राज्यात सध्या ना भाजप दम धरेनाय ना शिवसेना. इकडून राऊत (Sanjay Raut) आणि तिकडून सोमय्या (Kirit Soamaiyya) हा रोजचा वाद ऐकून लोकांनाही कंटाळ आलाय. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्र कायम सर्वांचा आदर करून काम करणारे राज्य आहे , सर्वांनी टोकाची भाषा बोलणे टाळले पाहिजे . सध्या राजकारणात दुसऱ्याचा सूड उगवणे हा जो नवा प्रकार दिल्लीला नवे सरकार आल्यापासून सुरु झालेला आहे . याच्यामुळे क्रिया प्रतिक्रिया जास्त उमटायला लागल्या आहेत . दोन्ही बाजूने त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत आणि सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये. अशा शब्दात आज जयंत पाटील यांनी राज्यात सुरु असलेल्या सूड नाट्यावर मार्मिक प्रतिक्रिया दिली . यावेळी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया देणाऱ्या राज्यातील सत्तेतील सहकाऱ्यांनाही टोले लगावले .

चव्हाणांच्या आवाहनावर पाटलांची प्रतिक्रिया

राज्यात सध्या तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले तरी यांच्यातच सध्या जोरदार फोडाफोडी सुरू आहे. कधी काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडत आहे. यावर एकमेकांचे पक्ष फोडू नये असा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला होता. यावर बोलताना मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देणे अयोग्य आहे. मात्र हे पक्ष सोडणारे नेते भाजपमध्ये जाणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना जयंत पाटील यांनी दिली . गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसची काही पदाधिकारी राष्ट्रवादीत गेल्यावर काँग्रेसनेही राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता .

नाना पटोले यांना जयंत पटलांचा टोला

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा जयंत पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला . नाना पटोले यांनी माहिती घेऊन बोलावे , राष्ट्रीय प्रश्नाबाबत राष्ट्रीय नेत्यांना बोलूदेत आपण स्थानिक असून आपल्याला दुसऱ्या राज्यातील परिस्थिती फारशी माहित नसते. याशिवाय हि झालेली बैठक काँग्रेसला धरून आहे की सोडून आहे हेही माहित नसते. अशा शब्दात पटोले यांना टोले लागवताना राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय नेते बोलतील आपल्यासारख्या स्थानिक नेत्यांनी यावर बोलणे टाळले पाहिजे असा खोचक सल्ला देखील दिला. काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी भाजपला रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया कालच पटोलेंनी दिली आहे.

प्रशासन मॅनेजमेंटपेक्षा महाविकास आघाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त, आठवलेंचा पुन्हा खोचक टोला

मराठी भाषा दिनावरुन विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला, तर राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याची टीका

प्रियांका गांधी दुसरी इंदिराच, लडकी हूँ, लड सकती हूँ नारा देशव्यापी-यशोमती ठाकूर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.