Solapur: एसटीच्या विलिनीकरणासाठी मोहोळच्या शेतकऱ्याचं तुळजाभवानीला साकडं, 45 किमीपर्यंत लोटांगण घालत आंदोलन

एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनकरण व्हावं, या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठींबा देत सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील शेतकरी अनिल पाटील यांनी सोलापूर ते तुळजापूर असं 45 किमी लोटांगण आंदोलन केलं.

Solapur: एसटीच्या विलिनीकरणासाठी मोहोळच्या शेतकऱ्याचं तुळजाभवानीला साकडं, 45 किमीपर्यंत लोटांगण घालत आंदोलन
सोलापूर ते तुळजापूर अंतर शेतकऱ्याचं लोटांगण आंदोलन

सोलापूरः एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभरात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी अनिल पाटील (Anil Patil) यांनी आज कर्मचाऱ्यांच्या वतीने लोटांगण आंदोलन सुरु केलं आहे. मागील पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर (ST Strike) असूनही राज्याचे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) दखल घेत नाहीत म्हणून सोलापूर रुपाभवानी ते तुळजापूरपर्यंत अनिल पाटील लोटांगण घालत जात आहेत.

‘सरकारला तुळजाभवानीने सद्बुद्धी द्यावी’

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील अनिल पाटील यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. सोलापूर ते तुळजापूर असे 45 किलोमीटरचे अंतर लोटांगण घालून पार केले जात आहे. या आंदोलनाद्वारे आई तुळजाभवानीपुढे आंदोलक साकडं घालत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना आई तुळजा भवानीने सद्बुद्धी द्यावी. त्यांच्या मागण्या मान्य करून योग्य तो न्याय करावा. अशी मागणी तुळजाभवानीकडे केली जात आहे.

उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावरही लोटांगण घालून आभार

अनिल पाटील हे मोहोळ तालुक्यातील शेतकरी असून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावरही त्यांनी तुळजाभवानीसमोर लोटांगण घातले होते. सुमारे 171 लोटांगण घालून राज्याला चांगला मुख्यमंत्री लाभल्यामुळे देवीचे आभार मानले होते. मात्र आता त्याच मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यांचं सरकारमध्ये विलिनीकरण करावं, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. मुख्यमंत्री आई तुळजाभवानीला मानतात, त्यामुळे मंगळवारी त्यांनी विलिनीकरणाची घोषणा करावी, या मागणीसाठी त्यांनी साकडं घातलं आहे.

इतर बातम्या-

बीडच्या कैद्याचा कारनामा! कारागृहातून 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा, मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता!

अनिल परबांना केबल कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम सोप्पं वाटतं का?; राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टीका


Published On - 2:57 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI