AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची राजकारणातून निवृत्ती? देशातल्या बड्या नेत्याची निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा

भाजप नेते निलेश राणे यांनी अचानक ट्विटरवर आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची पोस्ट टाकून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढली. त्यानंतर त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. यानंतर महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनीदेखील एक मोठी घोषणा केलीय.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची राजकारणातून निवृत्ती? देशातल्या बड्या नेत्याची निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Oct 25, 2023 | 9:27 PM
Share

सागर सुरवसे, Tv9 मराठी, सोलापूर | 25 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. काही घडामोडी उघडपणे घडताना दिसत आहेत. तर काही घडामोडी पडद्यामागे घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यात आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे आगामी काळात अतिशय महत्त्वाच्या राजकीय हालचाली घडण्याचे संकेत मिळत आहेत. असं असताना महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी थेट राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतोय, असं थेट म्हटलेलं नाही. पण यापुढे आपण एकही निवडणूक लढवणार नाही, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच पक्षाचं संघटनेचं काम आपण करत राहू, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलंय.

‘मी निवडणुकांमधून निवृत्ती घेतोय’

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरणही दिलं आहे. “मी निवडणुकांमधून निवृत्ती घेतोय. मात्र पक्षाचे काम करतच राहणार आहे”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. “मी 83 वर्षांचा झालोय. त्यामुळे पूर्वीसारखी धावपळ करणे होत नाही. मी निवडणुकांमधून निवृत्ती घेतोय. मात्र पक्ष संघटनेचे काम मी करतच राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.

‘उमेदवार ठरवण्याचे अधिकार हायकमांडला’

सुशीलकुमार शिंदे यांनी याआधीच सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कोण असेल याबाबत भाष्य केलंय. त्यांनी आपली कन्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार असतील, असं याआधी सांगितलं आहे. याबाबतही त्यांनी आज पुन्हा भूमिका स्पष्ट केली. “माझ्या दृष्टीने प्रणिती शिंदे या योग्य उमेदवार आहेत, असे मी म्हणालो. मात्र उमेदवार ठरवण्याचे अधिकार हायकमांडला आहेत. मी मूर्ख नाही की, प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर करेन. कारण काँग्रेसमध्ये हायकमांडच उमेदवार ठरवतो”, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.