शिवसेनेची दयामाया करायची तुमची औकात नाही; संजय शिरसाठ यांची ‘या’ नेत्यानं औकात काढली

सागर सुरवसे

| Edited By: |

Updated on: Jan 30, 2023 | 11:38 PM

आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या नादाला लागून शिवसेना बुडवली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

शिवसेनेची दयामाया करायची तुमची औकात नाही; संजय शिरसाठ यांची 'या' नेत्यानं औकात काढली

सोलापूरः शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांच्याकडून ठाकरे गटावर टीका केली जात आहे. त्यावरून आता शिंदे आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून टीका करण्यात आल्याने ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार संजय शिरसाठ यांच्या जीभेला हाड नाही त्यामुळे ते पाहिजे तशी वक्तव्य करत आहेत अशी टीका शरद कोळी यांनी केली आहे. त्याचबरोबर संजय शिरसाठ हा शिंदे गटाचा नाच्या असल्याची जहरी टीका शरद कोळी यांनी त्यांच्यावर केली आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटावर टीका केल्यानंतर शरद कोळी यांनी आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेनेची दयामाया दाखवायची काही गरज नाही असा टोला लगावत. तुमची तेवढी औकत नसल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

संजय शिरसाठ यांच्यावर टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा गद्दार हा शब्द वापरत गद्दारांनी शिवसेनेची दयामाया दाखवू नका अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ठाकरे गट संपला आहे अशी टीका वारंवार शिंदे गटाकडून केली जाते त्यावर बोलताना शरद कोळी यांनी सांगितले की, 2024 मध्येच आता तुम्हाला कळेल ठाकरे गट संपला आहे की, शिंदे गट संपला आहे असा विश्वासही ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यानी व्यक्त केला आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या नादाला लागून शिवसेना बुडवली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

त्यावर बोलताना शरद कोळी म्हणाले की, संजय शिरसाठी आधी तुमच्या जीभेला काही हाड आहे की नाही त्याची आधी तपासणी करा, संजय राऊत यांनी शिवसेना संपवली नाही तर त्यांनी शिवसेना ठामपणे भक्कम ठेवली आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI