AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू पैसे परत घेऊन तर दाखव बघते तुला… सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

"आपल्याला फक्त सत्तेसाठी बदल नकोय तर दिल्लीसमोर न झुकणारे सरकार पाहिजे. दिल्लीसमोर मुजरा करणार नाही, असे सरकार मला हवे आहे. प्रत्येक गोष्टीला हे दिल्लीसमोर झुकतात", असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

तू पैसे परत घेऊन तर दाखव बघते तुला... सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळे
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 13, 2024 | 2:42 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरातील माढ्यात पोहोचली आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला सुरुवात झाली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबोधित केलं. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी यावेळी धडाकेबाज भाषण केलं. “मी जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणते”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. तसेच सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी रवी राणा यांचा व्हिडीओ भर सभेत दाखवला.

“बहिणीला सासरी सोडणारा भाऊ असतो. पण हा भाऊ दिलेली ओवाळणी परत घेतो, असा दम देतोय. माझ्या राज्यातील बहिणीला असा दम कोणी दिला तर बहीण म्हणेल, तू पैसे परत घेऊन तर दाखव, बघते तुला. इतके दिवस सरकार होते तेव्हा बहिणी का नाही दिसल्या?”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.

‘अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आपण देणार?’

सुप्रिया सुळे यांनी यावेळी आमदार महेश शिंदे यांचादेखील व्हिडीओ भर सभेत दाखवत निशाणा साधला. “अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आपण देणार का? आपण एखाद्याला मदत करतो ती कपाळावर लिहून गावभर सांगायची नसते”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. “आपल्याला फक्त सत्तेसाठी बदल नकोय तर दिल्लीसमोर न झुकणारे सरकार पाहिजे. दिल्लीसमोर मुजरा करणार नाही, असे सरकार मला हवे आहे. प्रत्येक गोष्टीला हे दिल्लीसमोर झुकतात”, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

“अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी पैसे नाहीत. पण 18 हजार कोटींची मेट्रो करण्यासाठी पैसे आहेत. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी मी जे काही करायला हवं ते करायला तयार आहे. मी सरकारवर टीका केली की माझ्या नवऱ्याला IT ची नोटीस येते. मी म्हटलं आता निवडणूक होईपर्यंत रोज नोटीस येईल त्याची तयारी ठेवा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘उद्धव ठाकरे मला चिडवतात की…’

“माझी तुमच्याकडे बाई म्हणून एक विनंती आहे की, मला साथ द्या. त्यासाठी मी पदर पसरते. निवडणूक दिवाळी आधी झाली तर 75 दिवस साथ द्या. दिवाळी नंतर झाली तर 90 दिवस मला द्या”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. “शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मला चिडवतात की, तुझे वडील सारखे कसे दौरे काढतात. तुझी आई त्यांना ओरडत नाही का? मी म्हटलं हो ते कायम दौरे करतात. कारण ते त्यांचे टॉनिक आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“मी प्रत्येकाचा मान सन्मान कायम करेन. देशात टॅलेंटची कमी नाही. एकदा सोडून गेला तर नवीन तयार करू. आई गेली म्हणून लेकरं जगतात ना. त्यामुळे देशात टॅलेंट भरपूर आहे”, असं सुप्रिया म्हणाल्या. तसेच “गॅस सिलेंडरचे दर वाढले. त्यामुळे परत चुली पेटल्या आहेत”, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं