काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा तोल गेला; बिडीओला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; म्हणाले…

Congress Leader Siddharam Mhetre Statement : काँग्रेसचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. बीडीओ अधिकाऱ्याबद्दल सिद्धराम म्हेत्रे यांनी धक्कायदायक वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर बातमी...

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा तोल गेला; बिडीओला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; म्हणाले...
सिद्धाराम म्हेत्रेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 12:46 PM

सोलापूरमधील अक्कलकोट पंचायत समितीच्या बिडीओ अधिकाऱ्यावर काँग्रेस नेत्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा तोल ढासळला आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या बिडीओला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. सिद्धराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या बिडीओला दमदाटी केली आहे. पंचायत समितीला जाळ लावून बिडीओ तुम्हाला आत टाकेन. पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेल, माझं पोलीस किंवा कोणीही XX@# वाकडं करू शकत नाही, अशा शब्दात दमदाटी केली आहे.

सिद्धाराम म्हेत्रे यांनी बिडीओ धमकावलं

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या बिडीओ अधिकाऱ्याला धमकावलं आहे. पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेन. ‘त्या’ भवानीला समजून सांगा नाहीतर हे एक दिवस होणार आहे. शांत बसलो म्हणून तुम्ही फार करू लागलात का?, अशा शब्दात बीडिओ अधिकाऱ्याला सुनावलं आहे.

“जेलमध्ये गेलो तरी चालेल पण…”

हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधलं आहे. त्यामुळे हे जळायला मला फार वेळ लागणार नाही. या ऑफिसला जाळ लावून तुम्हाला आम्ही आत टाकतो मग काय करणार तुम्ही? माझ्यावर एक केस दाखल होईल. आम्ही त्यासाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात 25 वर्षे केस चालेल. माझं आयुष्य कोर्ट, कचेरी, केस त्यातच गेलं आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही, अशा शब्दात सिद्धराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या बिडीओ अधिकाऱ्याला दमदाटी केली आहे.

26 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीतर्फे अक्कलकोट तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याविरोधात हलगीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या अक्कलकोट पंचायत समितीचे बिडीओ शंकर कविटके यांना निवेदन देताना माजी आमदार म्हेत्रे यांनी दम दिला आहे. मी पंचायत समितीचं कार्यालय जाळून टाकेन, असं म्हणत सिद्धाराम म्हेत्रे यांनी धमकावलं आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी बिडीओला केलेल्या दमदाटीची तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. अक्कलकोटच्या स्थानिक लोकांमध्ये सिद्धराम म्हेत्रे यांचं वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे.

'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'.
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली.
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्...
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्....
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?.
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु.
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण.
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.