AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार-छगन भुजबळ भेटीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांच्यामध्ये जी चर्चा…

Jayant Patil on Sharad Pawar Chhagan Bhujbal Meeting : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापुरात आहेत. सोलापूरमध्ये त्यांनी पक्षाची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार-छगन भुजबळ भेटीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांच्यामध्ये जी चर्चा...
जयंत पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 18, 2024 | 7:38 PM
Share

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, अशी विनंती भुजबळांनी केली. छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारसाहेब आणि छगन भुजबळ यांच्यात काय चर्चा झाली, याचा तपशील माझ्याकडे नाही. मी त्याची माहितीही घेतली नाहीये. सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं आवश्यक असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील काय म्हणाले?

सरकारने दोन्ही बाजूला जी आश्वासनं दिली आहेत. त्या दिशेने सरकारने आता पावले टाकावीत. बैठकीचे गुऱ्हाळ कितीकाळ चालवणार आहात? जरांगे आणि ओबीसी यांच्याबरोबर सरकारकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केलीय. यावेळी विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घेऊन बरोबर नेले असते तर आम्ही समजू शकलो असतो. मात्र विरोधी पक्ष म्हणून विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यांना याचा तपशीलच माहिती नाहीये. मग चर्चा कशाची करणार? सरकारने याबाबत एखादा प्रस्ताव तयार केला असेल तर त्यावर चर्चा होऊ शकते, प्रस्ताव मांडला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार गटाचे काही नेते जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. माझ्या संपर्कात कोणी आमदार नाहीये. शरद पवारसाहेबांच्या ही संपर्कात आहेत की नाहीत, याबाबत मला माहिती नाही. आमचे जे निष्ठावंत कार्यकर्ते जे पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात बरोबर राहिले त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढची पावले टाकतोय, असंही ते म्हणाले.

जागा वाटपावर काय म्हणाले?

महाविकास आघाडी जगावाटपावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आकड्यांच्या तपशीलात मी जाणार नाही. माढ्यासाठी बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत. माळशिरसमध्ये फार नसून फक्त दोनच जणांची इच्छा आहे. सोलापूर शहर मध्यमध्ये तौफिक पैलवान, शहर उत्तर मधून महेश कोठे इच्छुक आहेत. आम्ही फक्त चर्चा केली आहे कोणालाही अर्ज भरायला सांगितलं नाही. महाविकास आघाडीची सध्या लाट आहे, जवळपास 170 च्या वरती जागा येतील, असा अंदाज जयंत पाटलांनी व्यक्त केला.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.