Solapur: मोठी खळबळ! मतदान केंद्रावरील अधिकार्‍याने भाजपला मतदान केल्याचा आरोप,मग पुढं झालं काय?

Solapur Municipal Corporation Election 2026 : सोलापूरमध्ये एक खळबळजनक घटनासमोर आली आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने भाजपला मतदान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोलापूरमधील एका केंद्रावर हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Solapur: मोठी खळबळ! मतदान केंद्रावरील अधिकार्‍याने भाजपला मतदान केल्याचा आरोप,मग पुढं झालं काय?
सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६
Image Credit source: प्रतिकात्मक चित्र
Reporter Sagar Surwase | Edited By: KALYAN DESHMUKH | Updated on: Jan 15, 2026 | 10:32 AM

Polling Booth Officer Caste Vote to BJP: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर यामुळे मोठा राडा झाला. येथील एका मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने थेट भाजपला मतदान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अपक्ष उमेदवाराने हा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे. काय आहे हा प्रकार?

मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Live

Municipal Election 2026

11:50 AM

राज ठाकरे यांनी केलेल सर्व आरोप खोटे, देवेंद्र फडणवीसांनी थेट पाडले तोंडावर...

11:45 AM

महाराष्ट्राची जनता विकासाच्या पाठीमागे- देवेंद्र फडणवीस

11:40 AM

BMC Election 2026 Voting : भाजपच्या महिला आमदाराला मतदान करताना भगवा गार्डने अडवलं

11:37 AM

BMC Election 2026 Voting : आठ वर्षांपासून निवडणुका प्रलंबित होत्या - राहुल शेवाळे

सोलापुरात मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने भाजपला मतदान केल्याचा आरोप उमेदवाराने केला आहे. या घटनेमुळे अपक्ष उमेदवार आणि अधिकार्‍यांची मतदान केंद्रावर बाचाबाची झाली.ईव्हीएम मशीनचे बटन दाबले जात नसल्याने मतदाराने अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.त्यानंतर अधिकार्‍याने मशीन तपासणी करताना थेट भाजपच्या उमेदवाराचे बटन दाबल्याचा आरोप या अपक्ष उमेदवाराने केला आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील उर्दू स्कूल केंद्रावरील हा प्रकार समोर आलाय.युवा मतदार तसेच अपक्ष उमेदवाराने याबाबत तक्रार केलीय. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी आणि चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सोलापूर महापालिकेत 564 उमेदवार रिंगणात

सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, 15 जानेवारी रोजी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. काही मतदान केंद्रावर सकाळीच EVM यंत्र सुरू न झाल्याने गडबड उडाली. काही ठिकाणी उशीरा मतदानाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांना ताटकाळावे लागले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीसाठी 564 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहरातील 9 लाख 24 हजार 706 मतदार आज मतदान उत्सवात सहभागी होतील. आज अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.

सोलापूर शहरात एकूण 26 प्रभाग असून 102 नगरसेवक निवडून येतील. प्रभागानुसार, महापालिका निवडणुकीत मतदारांना तीन अथवा चार मते द्यावी लागतील. यामध्ये सुरुवातीचे 1 ते 24 प्रभागात प्रत्येकी एका जागेसाठी चार मते द्यावी लागतील. तर अखेरचे प्रभाग 25 आणि 26 साठी मतदारांना तीन मते द्यावी लागतील. यावेळी ईव्हीएम चार रंगात असतील. सोलापूर शहरात एकूण 1,091 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल.