भरसभेत शरद पवारांचं लाव रे तो व्हीडिओ!; नरेंद्र मोदींचा जुना व्हीडिओ दाखवत म्हणाले…

Sharad Pawar on Narendra Modi BJP and Loksabha Election 2024 : शरद पवार यांची आज माढा लोकसभा मतदारसंघात सभा होत आहे. या सभेत शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांचा जुना व्हीडिओ दाखवला. हा व्हीडिओ दाखवत पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

भरसभेत शरद पवारांचं लाव रे तो व्हीडिओ!; नरेंद्र मोदींचा जुना व्हीडिओ दाखवत म्हणाले...
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 1:40 PM

देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. अशातच सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हीडिओ दाखवला. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं जुनं भाषण ऐकवलं. गेले दहा वर्षे देशात भाजपकडं सत्ता आहे. मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. अनेक आश्वासन दिली कि मी महागाई कमी करणार. 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत 5 रुपयाच्या खाली आणणार 2014 आधी पेट्रोलची किंमत 72 रुपये होती. पण आज 106 रुपये किंमत आहे. निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.

मोदी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

सत्तेत यायच्या आधी गॅस सिलेंडर स्वस्थात देऊ असं मोदींनी सांगितलं. तेव्हा गॅसची किंमत 460 होती. आज ती 1100 च्या वर गेली आहे. दहा वर्षात बेकारी कमी करू असे सांगितले. पण देशातील 100 पैकी 87 तरुण बेरोजगार आहेत. दहा वर्षात नोटा बंदी केली, त्यामुळे बँकेच्या दारात 700 लोकं दगावली, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदींवर घणाघात

सामान्य माणसांच्या अधिकारावर गदा आणली जातेय. अरविंद केजरीवाल हे 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी चांगले काम केले पण त्यांना तुरुंगात टाकलं. देशाच्या राजधानीच्या राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. मोदींचं सर्व कामकाज हुकूमशाहीच्या दिशेने चाललं आहे. जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यातील 10 वर्षे तुरुंगात घालवली. त्याच्यावर देशाचे पंतप्रधान टीका करतात. आतापर्यंत अनेक पंतप्रधान झाले या सर्वांनी देशाचा विचार केला. मात्र हा पहिला पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार करत नाही, असं शरद पवार म्हणाले.

मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विजय दादा झेडपी अध्यक्ष होते. सोलापूर जिल्ह्यात 5 लाख लोकांना दुष्काळी मदत केली. मोदींच्या मनात आले आणि कांदा निर्यातबंदी केली. साखर उत्पादनात राज्य एक नंबर ला होते पण साखरेवर निर्यात बंदी केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्या लोकांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे, असं आवाहन शरद पवारांनी उपस्थितांना केलं.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.