Solapur Accident : सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Solapur Accident : सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात
Image Credit source: TV9

कल्याणहून सोलापूरकडे घरचे सामान घेऊन आयशर टेम्पो चालला होता. यादरम्यान शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास देवडी गावातील शिवारात श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख आणि रिहान फैजल कयेशअल्ली हे दोघे जागीच ठार झाले.

सागर सुरवसे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 13, 2022 | 11:07 PM

सोलापूर : रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पो (Tempo)ला पाठीमागून पिकप जीप (Jeep)ने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार (Death) तर दोघे जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. देवडी गावच्या शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ शुक्रवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली. रिजवान अब्दुल गणी शेख (22) आणि रिहान फैजल कयेशअल्ली (35) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी टेम्पो चालक चेतन बिभीषण खंदारे यांच्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास अपघात पथकाचे ज्योतिबा पवार हे करीत आहेत.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला जीपची धडक

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणहून सोलापूरकडे घरचे सामान घेऊन आयशर टेम्पो चालला होता. यादरम्यान शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास देवडी गावातील शिवारात श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख आणि रिहान फैजल कयेशअल्ली हे दोघे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले दोघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आयशर टेम्पोचा चालक चेतन बिभीषण खंदारे हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीतत लग्नाची खरेदी करून येणाऱ्या भावी नवरदेवावर काळाचा घाला

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मागरुळी पेठ येथील नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. लग्नाची खरेदी करुन परतत असताना दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. सागर गिरी (28) असे मृत्यू झालेल्या भावी नवरदेवाचे नाव आहे. नागपूर येथे मेडीकल कॉलेजमध्ये उपचारा दरम्यान रात्री सागरचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुख:चे सावट पसरले आहे. सागर गिरी याचा विवाह सोहळा नागपूर येथे 18 मे 2022 ला होणार होता. त्यामुळे परिवारासह लग्नाच्या खरेदीसाठी गेले व खरेदी करून गावी परतत असताना दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें