तुळजापुरात कडकडीत बंद! संभाजीराजेंचा अवमान केल्याप्रकरणी गावकरी संतप्त, गाभाऱ्यात जाण्यापासून अडवल्यानं वाद

विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोनही केला होता. तरीदेखील त्यांना गाभाऱ्यात सोडण्यात आलं नव्हतं.

तुळजापुरात कडकडीत बंद! संभाजीराजेंचा अवमान केल्याप्रकरणी गावकरी संतप्त, गाभाऱ्यात जाण्यापासून अडवल्यानं वाद
कडकडीत बंदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 9:32 AM

उस्मानाबाद : तुळजापूरमध्ये (Tuljapur Temple News) बंदची हाक देण्यात आली होती. छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhaji Raje) यांचा अवमान केल्याप्रकरणी गावकरी संतप्त झाले होते. त्यामुळे तुळजापूरमधील गावकरी आणि व्यापाऱ्यांनी याबाबत निषेध नोंदवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक दिली होती. त्यानुसार तुळजापूरमध्ये कडकडीत बंद (Tuljapur closed) पाहायला मिळालाय. तुळजापूर शहर शंभर टक्के बंद असल्याचं चित्र गुरुवारी सकाळी पाहायलाम मिळालं. तुळजापूर बंदला पुजारी, व्यापारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जिल्हाधिकारी, मंदीर तहसीलदार व व्यवस्थापक यांच्या कारवाईच्या मागणीसाठी तुळजापूर शहर बंद ठेवण्यात आलंय. छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त झालेत. तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधिकारी यांनी प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवनी मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सोमवारी 9 मे रोजी छत्ररती संभाजीराजे हे तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. खरंतर छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेत असल्याचं याआधीही पाहण्यात आलं होतं.

मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली. त्यानंतर इतर भाविकांप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंनाही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात आला. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोनही केला होता. तरीदेखील त्यांना गाभाऱ्यात सोडण्यात आलं नव्हतं. शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज झाल्याचं सांगितलं जातं होतं.

कडकडीत बंदचा थेट आढावा : पाहा व्हिडीओ

कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकरणानंतर आता तुळजापूरमध्ये बंद पाळत निषेध नोंदवण्यात आला आहे. तसंच तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरी देखील नागरिक जिल्हाधिकरी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. मुजोर प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जाते आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.