AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सॉरी…सॉरी मामा तुमच्यागत माझं झालंय…पुन्हा फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून कुणी केला?

गेल्या काही दिवसांपूर्वच राज्यमंत्री दत्ता भरणे यांनीच चक्क बोलण्याच्या भरात फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आणि आत्ता तसाच प्रकार पुन्हा सोलापुरात समोर आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने (Yashvant Mane) यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून आले.

Video : सॉरी...सॉरी मामा तुमच्यागत माझं झालंय...पुन्हा फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून कुणी केला?
यशवंत मानेंना मुख्यमंत्र्यांचा विसर
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 10:11 PM
Share

सोलापूर : भर सभेत बोलताना नेतेमंडळींची अनेकदा गफलत होते. त्यात बोलण्याच्या भरात एखादी गोष्ट पटकन तोंडतून जाते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नेत्यांपासून ते जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून बोलायची सवयच लागली होती. मात्र अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) झाले. मात्र अजूनही काही जणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायची सवय जाईना झालीय. गेल्या काही दिवसांपूर्वच राज्यमंत्री दत्ता भरणे यांनीच चक्क बोलण्याच्या भरात फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आणि आत्ता तसाच प्रकार पुन्हा सोलापुरात समोर आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने (Yashvant Mane) यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून आले. त्यांनी भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला आहे.

नेमकं काय म्हणाले नेते?

आमदारांच्या ही चूक लक्षात येताच काही वेळातच त्यांनी ही चूक सावरलीही. लगेच दत्ता भरणेंना सॉरी…सॉरी मामा, माझंही तुमच्यासारखंच झालं आहे. म्हणत परिस्थिती सावरून घेतली मात्र तोवर पोरांनी हा व्हिडिओ व्हायरल केला ना राव. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड व्हायला लागला आहे. या व्हिडिओवर भरभरून कमेंट आणि लाईकही येऊ लागले आहेत. हा भन्नाट प्रकार मोहोळमधील परिवार संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटलांसमोर घडला आहे. त्यामुळे जयंत पाटलांनाही काय बोलवं हे कळालं नसेल. काही वेळ तेही बुचकाळ्यात पडले असतील. चूक लक्षात येताच दिलगीरी व्यक्त करत उध्दव ठाकरेंचे नाव घेतलं. मागील आठवड्यातच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदेखील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख केला होता.

दत्ता भरणे यांनाही पडलेला विसर

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षे उलटली. या काळात सरकारमधील प्रमुख आणि चर्चेतील चेहरे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अशा ठराविक नेत्यांची नावं आपल्याला घेता येतील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मात्र मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाची बाब म्हणजे भर सभेत दत्तामामांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता, जेव्हा स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मात्र त्यांनी आपली चूक सुधारली होती. आणि आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Mumbai Local : लोकलवरील निर्बंध हटणार नाहीत, लस न घेणाऱ्यांना प्रवासाची मुभा नाहीच, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेश

मुलुंड भागात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ! अमर नगर परिसरातली घटना, पोलिस आणि आरोपीमध्ये झटापट

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना अटकेपासून तूर्त दिलासा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.