ST Strike: नाशिक जिल्ह्यात 2100 बस फेऱ्या रद्द; खासगी प्रवासभाडे झाले चौपट, चाकरमानी कोंडीत

एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर सुरू असलेला संप चिघळला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात तब्बल 2100 बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

ST Strike: नाशिक जिल्ह्यात 2100 बस फेऱ्या रद्द; खासगी प्रवासभाडे झाले चौपट, चाकरमानी कोंडीत
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:22 AM

नाशिकः एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर सुरू असलेला संप चिघळला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात तब्बल 2100 बस फेऱ्या रद्द झाल्या असून, खासगी प्रवासभाडे चौपट झाल्याने चाकरमानी कोंडीत सापडले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने सर्वसामान्यांची मोठी कोंडी झाली आहे. नाशिक विभागातील सर्वच्या सर्व 13 डेपोतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र आहे. नाशिक, येवला, मनमाड, मालेगाव, नांदगावसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातले कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. अनेक चाकरमानी दीपावली सुट्टीसाठी कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यांना नोकरीच्या ठिकाणावर परतता येत नाही. त्यामुळे ते ठिकठिकाणच्या एसटी आगारावरच अडकून पडले आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत साऱ्यांची फरपट सुरू आहे. नाशिकहून मुंबई, पुणे, नगर, औरंगाबाद जाणारे आणि येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषतः नाशिकची उद्योगनगरी म्हणून ओळख आहे. मात्र, एसटी संपामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाळीसाठी अनेक चाकरमानी गावी गेले आहेत. त्यांना परत नाशिकला येण्यासाठी आणि नाशिकहून बाहेर जाण्यासाठी खासगी वाहनचालकांकडून अक्षरशः लूट सुरू आहे. जवळपास तिप्पट ते चौपट भाडे आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. हा संप सरकारने लवकरात लवकर मिटवावा, अशी मागणी होत आहे.

मागण्या गांभीर्याने घ्याव्या नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यात 2100 बस फेऱ्या रद्द झाल्याने आधाची आर्थिकदृष्ट्या गाळात गेलेल्या एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. आता आजही या बस फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे संप मिटेपर्यंत हा आर्थिक फटका महामंडळाला बसणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने गांभीर्याने घ्याव्यात. त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आम्ही जो संप पुकारला आहे, तो कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा पगारावरून आहे. या पगारात आमचा प्रपंच चालत नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून, ती वेळ आमच्यावर येऊ नये आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (ST staff strike, 2100 bus trips canceled in Nashik district, private fares increased)

इतर बातम्याः

मुंबई-नाशिक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 24 तासांत 5 ठार, दोन दुचाकीच्या टक्करमध्ये आज एक जण गतप्राण

Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.