नागपूर महापालिकेच्या 6 इंग्रजी शाळांना स्थायी समितीची मंजुरी

शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक अशा एकूण 6 शाळा स्थायी समितीने मंजुरी दिल्यामुळे सुरु होणार आहेत.

नागपूर महापालिकेच्या 6 इंग्रजी शाळांना स्थायी समितीची मंजुरी
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 7:48 PM

नागपूर : महानगरपालिकेच्या 6 इंग्रजी माध्यमांच्या शाळांना स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेच्या मदतीने नागपुरातील सहा विधानसभा क्षेत्रात या इंग्रजी माध्यमांच्या शाळा साकारल्या जाणार आहेत. शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक अशा एकूण 6 शाळा स्थायी समितीने मंजुरी दिल्यामुळे सुरु होणार आहेत.(Standing Committee approves 6 English schools of NMC)

नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित विषयावर चर्चा झाली. त्यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिल्यामुळे आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु होऊ शकणार आहेत. स्पर्धेच्या युगात आता मराठीसह इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश पालकांचा कल हा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडेच असल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी महानगरपालिकेच्या शाळांमधील पटसंख्याही दिवसेंदिवस कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

स्पर्धेत टिकण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या शाळांमधून गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळत राहावे, यासाठी मराठी, हिंदी आणि उर्दू प्रमाणेच आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानुसार आता नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक इंग्रजी शाळा सुरु करण्यात येणार आहे.

नागपूरच्या मेडिकल कॉलेजला कोरोनाचा विळखा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. नागपूरमध्ये तर मेडिकल कॉलेजलाच कोरोनाने विळखा घातला आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमधील 30 डॉक्टर्स, तीन नर्ससह एकूण 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर मेडिकल कॉलेजमधील कोरोना बाधितांचा आकडा 38 झाला आहे. त्यात डेंटल महाविद्यालयातील 9, एमबीबीएसच्या 12, पीजी करणाऱ्या 9 आणि तीन स्टाफ नर्सचा समावेश आहे. त्यापैकी चार जणांना गृह विलगिकरनात ठेवण्यात आलं आहे. तर बाकी सगळ्यांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकजण हे लक्षण नसलेले आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सुद्धा भरती करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेज सुरू झालं. त्यात वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी आले होते. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्यांना संक्रमण झालं. आता खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्टेल सॅनिटाइझ करण्यात आलं आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले, लग्नाच्या हॉलमध्ये घुसून कारवाई, 10 हजारांच्या दंडाची वसूली

नागपुरात वाढता कोरोनाचा संसर्ग, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Standing Committee approves 6 English schools of NMC

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.