AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘येत्या 36 तासांमध्ये पाकिस्तानसोबत युद्धाला सुरुवात’, भगरे गुरुजींचं भारताबाबत मोठं भाकीत, कुंडलीतील योगही सांगितला

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मोठं भाकीत केलं आहे, येत्या 36 तासांमध्ये युद्धाला सुरुवात होईल असा दावा त्यांनी केला आहे.

'येत्या 36 तासांमध्ये पाकिस्तानसोबत युद्धाला सुरुवात', भगरे गुरुजींचं भारताबाबत मोठं भाकीत, कुंडलीतील योगही सांगितला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2025 | 9:24 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानसोबतचा व्यापर देखील बंद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावर आहे. भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये औषधांचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे.

भारत -पाकिस्तान युद्धाबाबत आता प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या 36 तासांमध्ये भारत -पाकिस्तान युद्धाला सुरुवात होईल असा दावा त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  भारताला शनी तिसरा आहे. भारताची रास मकर आहे. भारताची साडेसाती 29 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे भारताचे ग्रह अनकुल असल्याचंही भगरे यांनी म्हटलं आहे.

युध्द झाले तर त्यामध्ये भारताची बाजू वरचढ आहे. मे महिन्यात तीन ग्रह बदलणार आहेत त्यामुळे दोन देशामध्ये मोठा उत्पाद घडण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे नुकसान पाकिस्तानचे होणार आहे. पाकिस्तानचा काही भूभाग आपल्याकडे येण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे येत्या 36 तासांमध्ये सीमेवर भारत पाकिस्तानमध्ये युध्दाला‌ सुरुवात होण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकले तर ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणता येईल,  अशी भविष्यवाणी ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी वतर्वली आहे. एवढंच नाही तर त्यांनी सध्या झालेल्या ग्रहस्थितीबाबत देखील माहिती दिली आहे. भगरे गुरुजी यांनी मोठा दावा केला आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.