AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तडकाफडकी रद्द, जरांगेंच्या आंदोलनामुळे प्रशासन अलर्ट मोडवर

Mumbai Police : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षण घेणारच, असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे जरांगे यांचे समाधान होण्यासाठी नेमके काय करायला हवे? असा प्रश्न सरकारपुढे उभा ठाकले […]

मोठी बातमी! मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तडकाफडकी रद्द, जरांगेंच्या आंदोलनामुळे प्रशासन अलर्ट मोडवर
mumbai police
| Updated on: Aug 29, 2025 | 10:29 PM
Share

Mumbai Police : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षण घेणारच, असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे जरांगे यांचे समाधान होण्यासाठी नेमके काय करायला हवे? असा प्रश्न सरकारपुढे उभा ठाकले आहे. दुसरीकडे ओबीसी संघटनांनीही उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आरक्षण देण्यास विरोध केल्यास आणखी मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे, असेही जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठा आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. परिणामी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेता आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांचे आंदोलन यामुळे सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

नेमका काय आदेश निघाला!

मिळालेल्या माहितीनुसार सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा आणि गैरहजर असलेल्या पोलिसांना तातडीने कर्तव्यावर येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नायगावच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पत्राद्वारे तशा सूचना केल्या आहेत. राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल आहेत. तसेच इतर पोलीस कर्मचारी सुट्टीवर असल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

खबरदारी म्हणून घेण्यात आला निर्णय

कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने मुंबईत अधिक पोलीस असणे गरजेचे असून त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो लोक मुंबईत आले आहेत. त्यांच्या वाहनांची व्यवस्था पाहण्यापासून इतर सर्वच गोष्टींची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सुट्टीवर असलेल्या आणि मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या सर्वच पोलिसांना तत्काळ सेवेसाठी हजर राहावे लागणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा