मोठी बातमी! ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार, राज्य सरकारचं केंद्राला पत्र
'खालिद का शिवाजी' हा चित्रपट येत्या आठ ऑगस्ट रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, मात्र त्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मोठी बतामी समोर येत आहे,’खालिद का शिवाजी’ हा चित्रपट येत्या आठ ऑगस्ट रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, मात्र त्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघाकडून होत आहे. हिंदू महासंघाकडून या चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला आहे. राज मोरे यांनी या चित्रपटाचं दिर्गदर्शन केलं आहे.
आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटासंदर्भात राज्य सराकारनं एक पत्र केंद्राला पाठवलं आहे. या पत्रामध्ये राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली आहे. राज्य पुरस्कार समारंभात या चित्रपटाविरोधात निदर्शने झाली होती, चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, अशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती राज्य सरकारकडून या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. संस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्याकडून माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रालयानं थेट हस्तक्षेप करत चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवण्याची शिफारस या पत्रात करण्यात आली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
या चित्रपटासंदर्भात राज्य सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून केंद्र सरकारला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रामध्ये राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, राज्य पुरस्कार समारंभात या चित्रपटाविरोधात निदर्शने झाली होती, त्यामुळे कायदा स्वव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे, तसेच केंद्रीय मंत्रालयानं हस्तक्षेप करत चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवावे, अशी शिफारसही करण्यात आली आहे.
या चित्रपटाला हिंदू महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे, चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचं आरोप हिंदू महासंघानं केलं आहे, त्यामुळे या चित्रपटाविरोधात हिंदू महासंघानं आक्रमक भूमिका घेतली आहे.
