AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ; उत्तर भारतीय घुसला अन्…नेमकं काय घडलं?

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली. याच पत्रकार परिषदेत अचानक गोंधळ उडाल्याची घटना घडली.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ; उत्तर भारतीय घुसला अन्...नेमकं काय घडलं?
election commission
| Updated on: Nov 04, 2025 | 6:44 PM
Share

Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम सविस्तरपणे सांगितला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्य राज्य निवडणूक आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. याच दरम्यान, पत्रकार परिषद चालू असतानाच मोठा गोंधळ उडाला. एका व्यक्तीला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नेमकं काय घडलं?

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद चालू होती. यावेळी उपस्थित असलेले पत्रकार निवडणूक आयोगाला एक-एक प्रश्न विचारत होते. तर निवडणूक आयोगदेखील विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देत होता. मात्र याच वेळी एक व्यक्ती आली आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारायला लागली. विशेष म्हणजे ही व्यक्ती पत्रकार नव्हती. तरीदेखील त्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत पत्रकार म्हणून स्थान देण्यात आलं. ही व्यक्ती पत्रकार नसल्याचे समजताच अन्य पत्रकारांनी त्यांना थांबवलं. पत्रकार नसताना तुम्ही प्रश्न का विचारत आहात? असा सवाल करत या व्यक्तीला थांबवण्यात आलं. नंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. सध्या या व्यक्तीची चौकशी चालू आहे.

राजेश त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने घातला गोंधळ

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजेश त्रिपाठी असे गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या वतीने या व्यक्तीने प्रश्न विचारला होता. मात्र त्याला पत्रकारांनी त्याला मध्येच रोखले आणि नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पक्षांतर आणि राजीनाम्यांची नवी लाट येण्याची शक्यता

दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचाराची रणधूमाळी पाहायला मिळणार आहे. सोबतच या काळात पक्षांतर आणि राजीनाम्यांची नवी लाट येऊ शकते. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...