AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र, प्रस्ताव सादर करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश

आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जमीन व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.

अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र, प्रस्ताव सादर करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश
DHANANJAY MUNDE LORD BUDDHA
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 7:46 PM
Share

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील अंजिठा-वेरुळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या (International Buddhist Center) विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जमीन व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रशासनाला दिले. (Submit proposal for International Buddhist Center in Ajanta Verul area of Aurangabad district ordered Social Justice Minister Dhananjay Munde)

मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक

मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दि.रा.डिंगळे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या एम.आर.पिंपरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या उपलब्ध जागेचा विचार करता येईल

यावेळी बैठकीत “आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या माध्यमातून बौद्धकालीन चित्रांचे जतन करणे गरजेचे आहे. अंजिठा-वेरुळ या पर्यटनस्थळाला आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल,” असे मुंडे म्हणाले. तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र विकसित करण्यासाठी अंजिठा-वेरुळ परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या उपलब्ध जागेचा विचार करता येईल. या प्रकल्पासाठी जागेची निश्चिती करुन तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, असेही मुंडे यावेळी म्हणाले.

यावेळी बैठकीत एम.आर.पिंपरे यांनी केंद्रातील कामांबाबत सादरीकरण केले. तसेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट, जागा आणि अंदाजित खर्चाची माहिती दिली.

इतर बातम्या :

कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी निधी उपलब्ध; प्रस्ताव सादर करण्याचे धनंजय मुंडेचे प्रशासनाला निर्देश

“अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनिषा कायंदेंचा टोला

मोठी बातमी! केंद्र सरकार 2012 मधील हा वादग्रस्त कर कायदा रद्द करणार; कॅबिनेटने दिली मंजुरी

(Submit proposal for International Buddhist Center in Anjitha Verul area of Aurangabad district ordered Social Justice Minister Dhananjay Munde)

(Submit proposal for International Buddhist Center in Ajanta Verul area of Aurangabad district ordered Social Justice Minister Dhananjay Munde)

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर