AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप नेत्याने केली प्रियांका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी; काय आहे कारण?

Sudhir Mungantiwar on Priyanka Gandhi : भाजप नेत्याकडून प्रियांका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रियांका गांधीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काय आहे कारण? राजीव गांधी यांचंही नाव मुनगंटीवार यांनी घेतलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

भाजप नेत्याने केली प्रियांका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी; काय आहे कारण?
प्रियांका गांधी, नेत्या, काँग्रेस Image Credit source: Facebook
| Updated on: Dec 09, 2024 | 1:55 PM
Share

महाराराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट काँग्रेस नेत्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि झारखंडमध्ये विजय कसा? असं वायनाडच्या ताईंनी राजीनामा द्यावा… जिंकायचं ईव्हीएमवर आणि दोषही द्यायचं ईव्हीएमला… 1988 साली राजीव गांधींनी कायदा पारीत केला होता. सुप्रीम कोर्टाने चॅलेंज दिल्यानंतर कॉंग्रेस का काही केली नाही?, असं मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेसोबतच वायनाडची लोकसभेची पोट निवडणूक झाली होती. यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

मुनगंटीवार यांचा काँग्रेसवर निशाणा

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. महायुतीचं सरकार आलं आहे. शरद पवार, उध्दव ठाकरेंना विनंती आहे. आपण एकत्रित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सीमेचा वाद सोडून घेऊ, ज्या गावांवर दावा आहे ते सोडवून घेऊ. 1956 मध्ये पंडीत नेहरूंच्या चुकीमुळे कर्नाटक सीमावाद पेटला आहे. बेळगावप्रश्नच कॉंग्रेसने जन्माला घातला. मराठी माणसांवर कॉंग्रेस अन्याय करते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कुणाच्या बंदूका होत्या. कुणाच्या गोळ्या होत्या. अफजल खानाचं अतिक्रमण नियमाकूल केलं, लाज वाटत नाही का?, असं मुनगंटीवार म्हणाले.

महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर वारंवार संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पेपर काऊंटींग करतोय. मग त्यात फरक का येत नाही. ईव्हीएमला कितीही दोष दिला तरीही फायदा नाही. काही लोकांसाठी हिंदुत्व बिमारी आहे. हिंदुत्व म्हणजे बापासाठी 14 वर्षे वनवास औरंगजेबासारख बापाला मारायचं नाही, असं ते म्हणालेत.

मेट्रो प्रकल्पासाठी झाडं तोडली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. यावरही मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतीही झाडाची कत्तल करता येत नाही परवानगी घेऊनच कत्तल करता येते. कायद्याने झाली की नाही माहिती घ्यावी लागेल. विरोधक कायदे माहिती न करता टीका करतात, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.