स्वप्निलला नेमकं काय व्हायचं होतं आणि काय झालं? बहिण सांगतेय भावाचं स्वप्न, MPSC मुळे किती स्वप्निल डिप्रेशनमध्ये?

2019 ला मेन्स झाल्यानंतर 2020 ला मुलाखत पडणं अपेक्षीत होतं. 2021 च्या मार्चपर्यंतही इंटरह्यू झाला नाही. दोन वर्ष गेली. अजूनही निर्णय झाला नाही. ह्याच्याच डिप्रेशनमध्ये तो गेला.

स्वप्निलला नेमकं काय व्हायचं होतं आणि काय झालं? बहिण सांगतेय भावाचं स्वप्न, MPSC मुळे किती स्वप्निल डिप्रेशनमध्ये?
Swapnil lonkar sister reacts
योगेश बोरसे

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 06, 2021 | 12:57 AM

एमपीएससी (MPSC) पास होऊनही मुलाखत होत नाही म्हणून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या घटनेचे पडसाद सभागृहातही उमटले. विरोधी पक्ष नेते फडणवीसांनी सभागृहात चर्चेची मागणी केली तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. दुसरीकडे स्वप्निल (Swapnil lonkar suicide) नेमका कसा होता, त्याला काय व्हायचं होतं, त्यानं असा का निर्णय घेतला यावर त्याचे मित्र, कुटुंबियही प्रकाश टाकतायत. यात सर्वात महत्वाची आहे ती स्वप्निलची बहिण.

आणि स्वप्निलला पाहून तिला काहीच सुचलं नाही
स्वप्निलनं फाशी घेतली त्यावेळेस तो घरात एकटाच होता. त्याचे आई वडील व्यवसायाच्या कामासाठी घराबाहेर होते तर बहिणही
तिच्या कामासाठी घरात नव्हती. पण आत्महत्येनंतर स्वप्निलला पहिल्यांदा पाहिलं ते त्याच्या बहिणीनेच. त्यावर ती म्हणाली- ‘मी घरात आले तेव्हा त्यानं फाशी घेतलेली होती. ते पाहिल्यानंतर मला काही सुचलं नाही. मला वाटलं माझा भाऊ वाचेल. पण खुप अगोदर
त्यानं फाशी घेतली होती. त्यामुळं त्याला वाचवता नाही आलं आम्हाला. पण असं काहीच झालं नव्हतं की, फाशी घेण्या इतपत टोकाचं पाऊल
नव्हतं उचलायला पाहिजे होतं. फक्त परिक्षेचं टेन्शन होतं. बाकी काहीच नव्हतं. घरच्यांना त्यानं लोण काढायला लावलं होतं. का तर 2020-21 मध्ये माझा इंटरह्यू होईल, मला जॉब भेटेल, मला गव्हर्नमेंटची नोकरी लागली तर आपलं सगळं चांगलं होईल. एवढ्या आशेवर त्यानं घरच्यांना लोण काढायला लावलं होतं.

डिप्रेशनमध्ये होता स्वप्निल? (Swapnil lonkar depression)
स्वप्निलची बहिण म्हणाली की, ‘घरच्यांनी घेतलेल्या लोणचंच डिप्रेशन आलं त्याला की, आपल्यामुळे लोण काढलं आणि घरच्यांना आता कोरोनाच्या परिस्थितीत बिजनस असल्यामुळे काहीच करता येत नव्हतं. हातावरचं पोट असल्यामुळं जे दिवसा येईल तेच रात्री खायचं. असं असल्यामुळे त्याला डिप्रेशन आलं की आपल्यामुळे झालं हे सगळं. त्या डिप्रेशनमधून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. त्यानं असं करायला नको होतं’.

स्वप्निलला कलेक्टर व्हायचं होतं पण
स्वप्निलच्या स्वप्नांबद्दल बोलताना त्याची बहिण म्हणाली की,- ‘त्याला कलेक्टर व्हायचं होतं. आमच्या घरच्या परिस्थितीमुळे त्यानं यूपीएससी
सोडून एमपीएससी करायला घेतली. एका आठवड्याच्या अभ्यासात तो इंजनिअरींग पासआऊट झाला डिस्टींक्शनने. एका आठवड्याच्याच
अभ्यासात त्यानं प्रिलिम क्रॅक केली. एवढा हुशार होता तो. त्यानंतर चार महिन्यात त्यानं मेन्स क्रॅक केली. 2019 ला मेन्स झाल्यानंतर 2020 ला
मुलाखत पडणं अपेक्षीत होतं. 2021 च्या मार्चपर्यंतही इंटरह्यू झाला नाही. दोन वर्ष गेली. अजूनही निर्णय झाला नाही. ह्याच्याच डिप्रेशनमध्ये तो गेला. अजून किती मुलं जातील माहित नाही, अजून किती मुलं गेल्यानंतर सरकारला जाग येणार माहित नाही. आज जी माझ्या कुटुंबावर वेळ आली ती कोणावर यायला नको. एवढच वाटतं’.
(Swapnil lonkar’s sister says he wanted to be a collector)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें