भुजबळसाहेब, जरा सबुरीने घ्या, नाहीतर…; शासकीय विश्रामगृहात जात स्वराज्य संघटनेचा इशारा

पुणे | 27 नोव्हेंबर 2023 : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना स्वराज्य संघटनेने इशारा दिला आहे. भुजबळांनी जरा सबुरीने घ्यावं, असा इशारा या संघटनेने दिला आहे. जर भुजबळांनी आपली विधानं थांबवली नाहीत. तर त्यांची गाडीही फोडू शकतो, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

भुजबळसाहेब, जरा सबुरीने घ्या, नाहीतर...; शासकीय विश्रामगृहात जात स्वराज्य संघटनेचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 11:14 AM

प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 27 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात जात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांनी जरा सबुरीने घ्यावं. अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि ओबीसी हक्कांसाठी छगन भुजबळ हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. आधी जालन्यात आणि काल हिंगोलीत त्यांनी ओबीसी एल्गार महासभा घेतल्या. या सभांमधून छगन भुजबळांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याची भूमिका मांडली. त्यानंतर मराठा समाज छगन भुजबळांना कडाडून विरोध करत आहे.

स्वराज्य संघटनेचा इशारा

स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. वेळ पडली तर छगन भुजबळ यांची गाडी इथे ही गाडीही फुटू शकते. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. छगन भुजबळ हे वारंवार वक्तव्य करून दोन समाजांमद्ये वाद लावत आहेत. त्यांनी हे वेळीच थांबवावं, असं म्हणत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.

समीर भुजबळ भेटीला पोहोचले

दरम्यान स्वराज्य संघटनेने शासकीय विश्रामगृहावर जात घोषणाबाजी केल्यानंतर भुजबळांचे पुतणे, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते समीर भुजबळ हे छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले आहेत. शासकीय विश्रामगृहात जाऊन स्वराज्यच्या कार्यकर्त्याने इशारा दिल्यानंतर ते भेटीसाठी आले आहेत. स्वराज्य संघटनेच्या या आंदोलनाविषयी विचारलं असता मला याची काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भुजबळांची भूमिका काय?

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षणाचा प्रश्न तात्पुरता सोडवण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले. त्यांनी याला कडाडून विरोधक केला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं हे ओबीसी समाजावर अन्याय करणारं असल्याचं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी जालना आणि हिंगोलीत दोन ओबीसी एल्गार महासभा घेतल्या. यातून त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही त्यांनी घणघाती टीका केली.

मराठा समाजाच्या संतापाची कारणं काय?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. सरकार काही पावलं उचलंत आहे. त्यात कुणीही व्यत्यय आणू नये, अशी भूमिका मराठा समाजाची आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्यांवरही त्यांचा आक्षेप आहे.

Non Stop LIVE Update
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, 'या' नेत्यानं काढली लायकी
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, 'या' नेत्यानं काढली लायकी.
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?.
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन..
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन...
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.