Accuse Dattatray Gade : आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला काही वेळातच शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. सध्या लष्कर पोलीस आरोपीला घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत.
स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. लष्कर पोलीस गाडे याला घेऊन कोर्टाकडे रवाना झालेले आहेत.
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या घटनेवर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. अखेर मध्यरात्री पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात यश आलं आहे. आज त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासाठी लष्कर पोलीस गाडे याला घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत.
Published on: Feb 28, 2025 06:26 PM
Latest Videos
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

