AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तनिषा भिसेंचा रुग्णालयात मानसिक छळ? नव्या दाव्याने खळबळ; CCTV चा उल्लेख करत कुटुंबियांचे गंभीर आरोप!

तनिषा भिसे प्रकरणात कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी CCTV चा उल्लेख करत रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.

तनिषा भिसेंचा रुग्णालयात मानसिक छळ? नव्या दाव्याने खळबळ; CCTV चा उल्लेख करत कुटुंबियांचे गंभीर आरोप!
Tanisha BhiseImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 06, 2025 | 1:42 PM
Share

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर भिसे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हॉस्पिटलवर केले गंभीर आरोप

तनिषा भिसे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कुटुंबातील सदस्य म्हणाले की, ‘डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्दे साफ खोटे आहे. आम्ही डॉक्टरांना सांगूनच हॉस्पिटलच्याबाहेर पडलो होतो. यासाठी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज खुले करा सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या, म्हणजे सत्य समोर येईल. तनिषा भिसे यांच्या आजाराबाबत खाजगी बाबी हॉस्पिटलने सार्वजनिक करायला नको होत्या. ते कायद्याने गुन्हा आहे याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार.’

‘हॉस्पिटलने पत्र काढण्याऐवजी…’

पुढे त्यांनी हॉस्पिटलने आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती असे म्हटले आहे. ‘डॉ. सुश्रुत घैसास यांचे नातेवाईक मानसी घैसास यांच्याकडे आम्ही आयबीएफ केले नसल्याचा राग डॉ. सुश्रुत घैसास यांना आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचे आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा. हॉस्पिटलने पत्र काढण्याऐवजी आमच्या समोरासमोर बसून चर्चा करावी. त्यादिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये जवळपास पाच ते साडेपाच तास होतो, हॉस्पिटलकडून तनिषा भिसे यांचा मानसिक छळ करण्यात आला’ असे ते म्हणाले.

काय आहे चौकशी अहवालात

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने चार मुद्यांवर भर दिला आहे. समितीने म्हटले की, महिला रुग्णासाठी सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसृती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला सहा महिने तपासणीसाठी आली नव्हती. अगावू रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, बाळांना दोन-अडीच महिने रुग्णालयात ठेवावे लागेल, तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरुन दाखल व्हा, असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.