AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘निसर्ग’प्रमाणेच तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना भरपाई, मुख्यमंत्र्यांची घोषणा, मदतीचा आकडा मात्र गुलदस्त्यात!

तौत्के चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय.

'निसर्ग'प्रमाणेच तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना भरपाई, मुख्यमंत्र्यांची घोषणा, मदतीचा आकडा मात्र गुलदस्त्यात!
तौत्के चक्रीवादळग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मदतीची घोषणा
| Updated on: May 25, 2021 | 5:00 PM
Share

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून कोकणवासीय सावरत नाहीत तोच तौत्के चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिला. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेकांची घरं पडली, पत्रे उडून गेले, त्यामुळे संसार उघड्यावर आहे. अनेकांची जनावरं या वादळात दगावली. उपजीविकेचं साधन नष्ट झालं. चक्रीवादळाच्या या दुष्टचक्रात अडकलेल्या कोकणवासियांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न आता राज्य सरकार करताना पाहायला मिळतंय. तौत्के चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. मात्र, मदतीचा आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. (Thackeray Government announces help to Konkan people affected by cyclone Tauktae)

गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर तौत्के चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिला. या तडाख्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील हजारो नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांकडून आज सांगण्यात आलं. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. दौऱ्यावेळी तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल. कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना कशाप्रकारे मदत?

मार्च 2020 मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या नियमांपेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी ही मदत 95 हजार इतकी दिली जात होती. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करत तातडीने 100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपये मदतीची घोषणा केली होती.

‘निसर्गा’च्या तडाख्यानंतर किती मदत?

  • घर पूर्ण नष्ट – दीड लाख रुपये
  • काही प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना 6 हजाराऐवजी 15 हजार मिळणार
  • घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे त्यांना 35 हजार मिळणार
  • NDRF च्या निकषांच्या वरती जो खर्च लागेल तो राज्य सरकार देणार
  • नुकसान झालेल्यांना 10 हजार रोख रक्कम देणार
  • शेतीचं हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला 25 हजाराहून 50 हजार रुपयांची मदत
  • कम्युनिटी किचन सुरु करणार
  • पुढील दोन महिने मोफत धान्य देणार

संबंधित बातम्या :

Video : तौत्के चक्रीवादळाच्या तांडवातून वाचलेले ‘मृत्यूंजय’! 24 तासापेक्षा अधिक काळ समुद्रात काढल्यानंतर वाचले प्राण

Tauktae Cyclone | कुठे झाडांची पडझड, कुठे घरांचे नुकसान, महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हाहा:कार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.