AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समारोप कार्यक्रमात गाणं सादर करतानाच शिक्षकाचा स्टेजवरच मृत्यू

टेक्निकल हायस्कूलमध्ये गीत सादर करतानाच माजी शिक्षक विनायक कुंभार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सगळे हादरले.

समारोप कार्यक्रमात गाणं सादर करतानाच शिक्षकाचा स्टेजवरच मृत्यू
गाणं सादर करताना स्टेजवरच शिक्षकाचा मृत्यू
| Updated on: May 31, 2025 | 12:30 PM
Share

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे … वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे… असे गीत म्हणतच जगाला निरोप देत कार्यक्रमस्थळीच माजी शिक्षक विनायक सकाराम कुंभार यांचा मृत्यू झाला. यामुळे सगळेच हळहळले. कुंभार हे ( वय 78) जयसिंगपूर येथे रहात होते, मूळचे पन्हाळ्यचे राहणारे होत. कार्यक्रमात गाणं गात असतानाच, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने उदगाव व जयसिंगपूर परिसरात शोककाळ पसरली आहे.

विवो कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव (ता.शिरोळ) येथील आप्पासाहेब उर्फ डॉ.सा.रे.पाटील उदगांव टेक्निकल हायस्कूल उदगांवच्या नवीन सभागृहात सन 2001-02 च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावी शुक्रवारी आयोजित केला होता. 10 वाजता 100 हुन अधिक माजी विद्यार्थी एकत्रित झाले. माजी शिक्षक विनायक कुंभार व इतर शिक्षक राष्ट्रीय गीत व प्रार्थना घेऊन सभागृहात दाखल झाले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर सर्व आजी-माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली.

गीत गातानाच घेतला अखेरचा श्वास

यानंतर 2005 साली निवृत्त झालेले विनायक सकाराम कुंभार यांना प्रथम मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात माणसाबरोबर चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे. पैसे, सोने, संपत्ती ही आपल्या जगवत नसून माणुसकीच जगायला शिकवते, असं सांगत भावूक मनोगत व्यक्त केलं. भाषणाच्या शेवटी जीवनात आनंदी राहण्यासाठी मी तुम्हाला एक गीत गाऊन दाखवतो असे म्हणू, त्यांनी आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे… वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नवात फिरला जगात उरला… मात्रम या वाक्यापर्यंत आल्यानंतर त्यांना अचानक हृदय विकाराचा धक्का बसला. ते कार्यक्रमास्थळी कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे पाहून घटनास्थळी माजी विद्यार्थी हादरलेच. शिक्षक गेल्याचे पाहून काही विद्यार्थीनींचा आक्रोश हा हृदय पिळवटूवन टाकणारा होता.

त्यांना तातडीने सांगली खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  कुंभार यांचा एक मुलगा पुणे व दुसरा मुलगा दिल्ली येथे असल्याने मृतदेह खाजगी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.  मुले घरी आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उदगावातील या घटनेमुळे जयसिंगपूव व उदगावात शोककळा पसरली आहे. माजी शिक्षक कुंभार यांच्या पत्नीचेही काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे. मुले नोकरी निमित्त बाहेर असल्याने ते एकटेच घरी असायचे.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.